इशिता दत्ताला कन्यारत्न
दुसऱ्यांदा अनुभवले मातृत्व
अभिनेत्री इशिता दत्ता आणि वत्सल सेठ या दांपत्याच्या घरात नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला आहे. इशिता दुसऱ्यांदा आई झाली असून तिने स्वत:च्या मुलीची झलकही चाहत्यांना दाखविली आहे. इशिताला दृश्यम या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाते.
इशिता दत्ता आणि वत्सल सेठ हे टीव्ही शो ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’च्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले होते. 2017 मध्ये दोघांनी विवाह केला होता. तर 19 जुलै 2023 रोजी इशिताने मुलाला जन्म दिला होता. आता दोन वर्षांनी दांपत्याने दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले आहे. इशिताने रुग्णालयातून कुटुंबाचे एक छायाचित्र शेअर केले आहे.
आमचा परिवार आता पूर्ण झाला आहे. एका मुलीचा कुटुंबात समावेश झाल्याने आम्ही धन्य झालो आहोत असे इशिताने म्हटले आहे. इशिताच्या या पोस्टवर सुनील शेट्टी, रिद्धिमा पंडित, हेली शाह, किश्वर मर्चंट, रकुल प्रीत सिंह, सीमा सजदेह, सुनयना फौजदार, वाहबिज दोराबजी समवेत अनेक कलाकारांनी कॉमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.