इशा सिंग, भावेश शेखावत आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीत नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी इशा सिंग आणि भावेश शेखावत यांनी 25 मी. रॅपीड फायर पिस्तूल नेमबाजीत आघाडीचे स्थान मिळवले आहे.
महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत इशा सिंगने 585 गुण नोंदवित पहिले स्थान मिळविले. सिमरनजीत कौर ब्रारने 583 गुणासह दुसरे तर मनू भाकरने 582 गुणासह तिसरे स्थान मिळविले. अभिज्ञा पाटीलने 577 गुणासह चौथे व रिदम सांगवानने 574 गुणासह पाचवे स्थान घेतले आहे. सदर ऑलिम्पिक निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा येथील डॉ. कर्नीसिंग नेमबाजी संकुलात घेतली जात आहे.
पुरुषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तूल नेमबाजीत भावेश शेखावतने 580 गुणासह पहिले स्थान तर विजयवीर सिद्धूने 579 गुणासह दुसरे तर अनिषने 578 गुणासह तिसरे स्थान घेतले आहे. आदर्श सिंगने 572 आणि अंकूर गोयलने 564 गुण नोंदवले आहे. आता हे सर्व नेमबाज शनिवारी अंतिम फेरीसाठी दाखल होतील.