‘लवली लोला’मध्ये ईशा मालवीयची एंट्री
गौहर खान देखील मुख्य भूमिकेत
रवि दुबे आणि सरगुन मेहता यांनी लाँच केलेला प्लॅटफॉर्म ड्रीमियाता ड्रामाची सध्या चर्चा सुरू आहे. अलिकडेच अभिनेत्री गौहर खान याच्या डेब्यू शोमध्ये सामील होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. निर्मात्यांनी ईशा मालवीयची निवड केली आहे.
ईशा मालवीय आता लवली लोला या शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ईशा आणि गौहरने एक रील पोस्ट करत लवली लोला शोमधील स्वत:सच्या एंट्रीची घोषणा केली आहे. लवली लोला अत्यंत लवकरच तुमचे मन जिंकण्यासाठी येत आहे असे या पोस्टच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे.
ईशा मालवीर ही रवि दुबे आणि सरगुन मेहता यांच्या ड्रीमियाता प्रॉडक्शन्सोबत दुसऱ्यांदा जोडली जात आहे. यापूर्वी तिने ‘उडारियां’मध्ये एकत्र काम केले होते. 6 नोव्हेंबर रोजी रवि दुबे आणि सरगुन मेहता यांनी स्वत:चे मनोरंजन व्यासपीठ ड्रीमियाता ड्रामाची घोषणा केली होती.