महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

15 वर्षांपासून एकसारखेच आयुष्य जगतोय इसम

06:49 AM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न जेवण बदलतो न कपडे, फिक्स आहे  रुटीन

Advertisement

आयुष्य हे धावपळीने युक्त असून दरदिनी होणारे छोटे छोटे बदल ते कायम राखत असतात. एकसारखे आयुष्य जर 4-5 वर्षांपर्यंत जगलो तर कंटाळा येऊ लागतो असे लोक म्हणतात. परंतु जर तुम्ही 15 वर्षांपर्यंत एकसारखेच जेवण, एकाच प्रकारचे कपडे, नोकरी आणि दिनक्रमात बांधले गेला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

Advertisement

तुम्ही एकाच प्रकारचे जेवण आठवडभर खाल्लात तर सहन करू शकत नाही. परंतु एक इसम मागील 15 वर्षांपासून एकाच प्रकारचे जीवन जगत आहे. मागील दीड दशकात जपानमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने किंचितही बदल केलेला नाह. तो रोबोटप्रमाणेच एका साच्यातील आयुष्य जगत आहे, परंतु त्याने याचे अनेक लाभही सांगितले आहेत.

एका पॅटर्नमध्ये सेट आहे लाइफ

जपानमध्ये राहणारा गो कीता याचे  वय 38 वर्षे असून तो मागील 15 वर्षांपासून स्वत:च्या आयुष्याला एका सेट पॅटर्नमध्ये जगत आहे. त्याने स्वत:ची नोकरी देखील दीड दशकात बदललेली नाही. ता नाश्त्यामध्ये नट्स आणि रेमन खातो, दुपारच्या जेवणात चिकन ब्रेस्ट घेतो आणि रात्री बीन्ससोबत स्टर फ्राइड पोर्क खात असतो. त्याच्या खाण्याचे प्रमाण आणि सप्लिमेंट देखील ठरलेले आहेत. तो एकाच स्टाइला शर्ट आणि ट्राउजर दरदिनी परिधान करतो. एवढेच नाही तर त्याचे सॉक्स आणि अंतर्वस्त्रs देखील एकसारखीच असतात. शेविंग, लॉन्ड्री आणि नखं-केस कापण्याची वेळ देखील निर्धारित आहे.

स्वत:चा छळ का?

या सर्व प्रकारांमुळे माझ्या मेंदूवर ताण कमी राहतो आणि मी प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतो. याबद्दल मला जपानी बेसबॉलपटू इचिरो सुझुकींकडून प्रेरणा मिळाली. सर्वसाधारणपणे आम्ही दिवसात 30 हजार छोटे मोठे निर्णय घेत असतो. परंतु शिस्तबद्ध जीवनामुळे हा वेळ आणि ताण वाचतो. याचमुळे माझे जीवन दबाव आणि तणावरहित राहते असे कीता यांनी सांगितले आहे.

Advertisement
Next Article