ऑफिस आहे का जेल?
कंपनीत फोन, टॉयलेट ब्रेक अन् लंच टाईमबद्दल कठोर नियम
चीनमध्ये एक अशी कंपनी आहे, जेथे कर्मचाऱ्यांसाठी तुरुंगापेक्षाही अधिक कठोर वातावरण आहे. सोशल मीडियावर याबद्दल चर्चा झाल्यावर कंपनीवर जोरदार टीका होत असून तेथील अशा स्थितीसाठी जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
चीनच्या अनहुई प्रांतातील हेफेईमधील डेंटल केयरची उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीत तुरुंगासारखी कठोर ऑफिस पॉलिसी आहे. येथे कर्मचाऱ्यांकडून फूड डिलिव्हरी घेण्यासाठी स्वत:च्या जागेवरून हलू शकत नाहीत. त्यांना मर्यादित वेळेसाठी टॉयलेट ब्रेक दिला जातो. कार्यालयीन वेळेमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी असून कुठल्याही आपत्कालीन स्थितीत देखील ऑफिसबाहेर पडता येत नाही.
तुरुंगासारखी ऑफिसची स्थिती
अलिकडेच चिनी सोशल मीडियावर हा वाद समोर आला. चीनच्या या कंपनीला या ‘जेल-शैली’युक्त कार्यस्थिती लागू करण्यासाठी कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागते. तेथील कार्यस्थळ धोरणे कठोर असून व्यवस्थापन शैली कठोर आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा खुलासा सोशल मीडियावर झाला आहे.
कंपनीची मोठी हिस्सेदारी
सुपर डियर (चिनी भाषेत शियाओलुमामा) नावाच्या या कंपनीच्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीने 2023 च्या पहिल्या सहामाहीत डेंटल उत्पादनांमध्ये 75 टक्के बाजार हिस्सेदारी प्राप्त केली. याची वार्षिक विक्री कथितपणे 400 दशलक्ष युआनपर्यंत (55 दशलक्ष डॉलर्स) पोहोचली आहे.
सोशल मीडियावर संताप व्यक्त
या कंपनीच्या ऑफिसमध्ये लागू धोरणांची एक प्रत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या नियमांची प्रत पाहिल्यावर कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांदरम्यान मोबाईलचा वापर करणे किंवा कंपनी परिसरातून बाहेर पडण्यावर कठोर बंदी असल्याचे कळते. कर्मचाऱ्यांना लंच ब्रेकदरम्यान देखील कार्यालयातून बाहेर जाण्याची अनुमती नाही. त्यांना फूड मागविण्यासाठी स्वत:च्या डेस्कपुरतीच मर्यादित ठेवले जाते. म्हणजेच डेस्कच्या बाहेर पडून ऑफिसच्या गेटवर जात फूड डिलिव्हरीही त्यांना घेता येत नाही.