For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएस दहशतवाद्याला उत्तर प्रदेशमध्ये अटक

06:22 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएस दहशतवाद्याला उत्तर प्रदेशमध्ये अटक
Advertisement

अलिगडमध्ये कारवाई : एटीएस करणार चौकशी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये एटीएसने अलिगडमधून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. फैजान बख्तियार असे त्याचे नाव असून त्याच्यावर 25 हजार ऊपयांचे बक्षीस होते. आतापर्यंत या मॉड्यूलमधील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एटीएस लवकरच फैजानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणार आहे.

Advertisement

फैजानने प्रयागराजच्या रिझवान अश्र्रफ यांच्यामार्फत आयएसमध्ये प्रवेश केला होता. फैजानने त्याच्या काही साथीदारांसह अलिगडचे आयएसआयएस मॉड्यूल तयार केले होते. या मॉड्यूलमधील सर्वांना एटीएसने अटक केली आहे. हे मॉड्यूल मोठी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी सज्ज होते. फैजान बख्तियार अलिगड मुस्लीम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत होता. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठातून पेट्रोकेमिकलमध्ये बीटेक केलेल्या अब्दुल्ला अर्सलानला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली होती. अर्सलान आयएसआयएस संघटनेशी संबंधित असून तो जिहादसाठी येथे स्वतंत्र गट तयार करत असल्याचा एटीएसचा दावा आहे. एटीएसने अब्दुल्ला अर्सलानच्या खोलीतून असे अनेक दस्तऐवज जप्त केले असून त्यात थेट दहशतवादी कारवायांची लिंक सापडली आहे. अब्दुल्ला अर्सलानकडून पेन ड्राईव्ह, मोबाईल फोनसह अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या असून त्यात आयएसआयएस संघटनेशी असलेले धागेदोरे सापडले आहेत.

Advertisement
Tags :

.