महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतातील ‘आयएस’ प्रमुखाला अटक

06:31 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आसाम-धरमशाला येथे साथीदारासह जाळ्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

‘आयएसआयएस’ (इसिस) इंडियाचा प्रमुख हारिश अजमल फाऊकी आणि त्याच्या साथीदाराला आसाम एसटीएफने बुधवारी धुबरी सेक्टरमधील धरमशाला परिसरातून अटक केली. या दोन्ही आरोपींचा एनआयएने वॉन्टेड यादीत समावेश केला होता. फाऊकी हा भारतातील ‘आयएस’चा प्रमुख आहे. एसटीएफने हारिशचा सहकारी अनुराग सिंग उर्फ रेहान यालाही अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांनाही एनआयएकडे सोपवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

‘आयएस’चे काही हस्तक बांगलादेश सीमेवरून भारतात येत असल्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे धरमशाला परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहाटे 4.15 वाजता संशयित सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडले, असे आसाम पोलीस पीआरओ प्रणवज्योती गोस्वामी यांनी सांगितले. त्यांच्या ओळखीची खातरजमा झाल्यानंतर दोघांनाही अटक करून गुवाहाटी येथील एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाऊकी हा देहराडूनच्या चकराता येथील रहिवासी आहे. तर अनुराग सिंग हा पानिपतचा रहिवासी आहे. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्याची पत्नी बांगलादेशी नागरिक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही ‘आयएस’साठी निधी गोळा करण्यात आणि दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेले आहेत. या दोघांविऊद्ध दिल्ली आणि लखनौमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article