बाशुदेव जिवंत आहे की काय?
जुने गोवे पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह : चौदा दिवसांनंतरही बाशुदेव बेपत्ताच,सांत इस्तेव येथे कार बुडाल्याची दुर्घटना
पणजी : सांत इस्तेव येथील टोलटो फेरीबोट धक्क्यावरुन कार नदीत बुडून झालेल्या दुर्घटनेतील बाशुदेव भंडारी हा 14 दिवसानंतरही बेपत्ता असून जुने गोवे पोलिसांनी आता तपासाची चक्रे बदलली आहेत. या दुर्घटनेतून वाचलेल्या तऊणीला (बाशुदेवची मैत्रीण) पोलिसांनी पुढील चार दिवस पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण केले आहे. बाशुदेवच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा कोणीतरी उचलल्याचे समोर आल्यामुळे तो जिवंत आहे की काय? या दिशेने तपासकाम सुऊ करण्यात आले आहे. बाशुदेवचा थांगपत्ता न लागल्यामुळे पोलिसांनी आता उलट्या दिशेने चौकशी चालू केली आहे. भंडारी पुटुंब मूळचे नेपाळमधील असून ते गुजरातमध्ये व्यवसायासाठी स्थायिक झाले आहे. त्यामुळे बाशुदेव गुपचुप नेपाळला गेला की काय, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरील विमानतळ, रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि इतर ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कुणीतरी घेतला बाशुदेवच्या फोनवरील कॉल
बाशुदेवच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा कोणीतरी फोन उचलला होता, अशी माहिती बाशुदेवच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे, म्हणून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुऊ केला आहे. एकंदरीत प्रकारात बाशुदेव जिवंत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाशुदेवची मैत्रीण दुर्घटनेनंतर जवळच्या घरात गेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. बाशुदेवच्या भावाने त्या घरात जाऊन चौकशी केली तेव्हा एक मुलगी रात्री आली होती आणि तिने अपघात झाल्याचे सांगितले अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. शिवाय तिने त्या घरातील एका मोबाईलवऊन आईला फोन लावला व कोणाचा तरी नंबर मिळवून बराच वेळ बोलली असेही चौकशीतून आढळले आहे. हे सर्व पोलिसांना संशयास्पद वाटत असून त्यासाठीच आता बाशुदेवच्या मैत्रिणीला पुन्हा उलटतपासणीसाठी बोलावले आहे.