For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयर्लंडचा पाकवर थरारक विजय

06:34 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयर्लंडचा पाकवर थरारक विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ डब्लीन

Advertisement

पाकचा क्रिकेट संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर असून उभय संघामध्ये सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान आर्यंलंडने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 5 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. आयर्लंडने हा सामना 1 चेंडू बाकी ठेवून जिंकला. या सामन्यात आयर्लंडच्या अँडी बेलबिरेनीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या पहिल्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 6 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 19.5 षटकात 5 बाद 183 धावा जमवित विजय नोंदविला.

Advertisement

पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमने 43 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 57, सईम अयुबने 29 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 45, फक्र झमानने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20, इफ्तीकार अहमदने 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 धावा जमविताना शाहीन आफ्रिदी समवेत 7 व्या गड्यासाठी अभेद्य 32 धावांची भागिदारी केली. आफ्रिदीने 8 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. पाकच्या डावात 10 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे यंगने 2 तर अॅडेर, डिलेनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकचे दोन फलंदाज धावचीत झाले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंड संघातील सलामीचा फलंदाज अँडी बेलबिरेनीने 55 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 77, टेक्टरने 27 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 36, डॉक्रेलने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24, डिलेनीने 6 चेंडूत नाबाद 10 तर कँफरने 7 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे अब्बास आफ्रिदीने 36 धावात 2 तर इमाद वासिम, नसिम शहा आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 6 बाद 182 (सईम आयुब 45, बाबर आझम 57, इफ्तीकार अहमद नाबाद 37, फक्र जमान 20, शाहीन आफ्रिदी नाबाद 14, यंग 2-27, अॅडेर, डिलेनी प्रत्येकी एक बळी), आयर्लंड 19.5 षटकात 5 बाद 183 (बेलबिरेनी 77, टेक्टर 36, डॉक्रेल 24, डिलेनी नाबाद 10, कँफर नाबाद 15, अब्बास आफ्रिदी 2-36, शाहीन आफ्रिदी, नसिम शहा, इमाद वासिम प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.