महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयर्लंडकडून बांगलादेशचा व्हाईटवॉश

06:51 AM Dec 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

वृत्तसंस्था / सिलेत

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान बागंलादेशचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. आयर्लंडच्या ओरीया प्रेंडरगेस्टला ‘मालिकावीर’ तर लॉरा डिलेनीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या मालिकेतील शेवटच्या सामन्यात आयर्लंडने बांगलादेशचा एक चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला. या शेवटच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 7 बाद 123 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंड महिला संघाने 19.5 षटकात 6 बाद 124 धावा जमवित विजय नोंदविला.

बांगलादेशच्या डावात सलामीच्या शोभना मोसेट्रीने 43 चेंडूत 6 चौकारांसह 45, शर्मिन अख्तरने 33 चेंडूत 4 चौकारांसह 34, मुर्शिदा खातुनने 12 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. बांगलादेशला 15 अवांतर धावा मिळाल्या. आयर्लंडतर्फे प्रेंडरगेस्टने 22 धावांत 4 तर मॅग्युरीने 25 धावांत 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये सलामीच्या अॅमी हंटरने 24 चेंडूत 3 चौकारांसह 28, कर्णधार लेव्हीसने 24 चेंडूत 3 चौकारांसह 21, प्रेंडर गेस्टने 13 चेंडूत 1 चौकारांसह 11, डिलेनीने 31 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 36, स्टोकेलने 22 चेंडूत 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे रबीया खानने 17 धावांत 2 तर नाहीदा अख्तर आणि फिरदोश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 20 षटकात 7 बाद 123, (मोसेट्री 45, शर्मिन अख्तर 34, खातुन 12, अवांतर 15 प्रेंडरगेस्ट 4-22, मॅग्युरी 2-25), आयर्लंड 19.5 षटकात 6 बाद 124 (डिलेनी नाबाद 36, हंटर 28, लेव्हीस 21, प्रेंडरगेस्ट 11, स्टोकेल 19, रबीया खान 2-17, नाहीदा अख्तर आणि फिरदोश प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media