महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आयर्लंड, नॉर्वे, स्पेनकडून पॅलेस्टाईनला मान्यता

06:11 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नाराज इस्रायलने परत बोलाविला राजदूत : 8 महिन्यांपासून हमाससोबत संघर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisement

पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये इस्रायल-हमास यांच्यात आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हा संघर्ष संपण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसून येत नाहीत. याचदरम्यान आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेनने औपचारिक स्वरुपात पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाराज होत इस्रायलने आयर्लंड आणि नॉर्वेमधील स्वत:चे राजदूत तत्काळ प्रभावाने परत बोलाविण्याचे पाऊल उचलले आहे.

आयर्लंड आणि नॉर्वेला एक स्पष्ट संदेश पाठवत आहे. इस्रायल स्वत:च्या सार्वभौमत्वाला कमजोर करणे आणि याच्या सुरक्षेला धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात कधीच गप्प बसणार नाही असे इस्रायलचे विदेशमंत्री इस्रायल काट्ज यांनी बुधवारी म्हटले आहे. इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. इस्रायलकडून होणाऱ्या कारवाईला आता काही प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.

स्पेनलाही इशारा

स्पेनच्या विरोधात अशाच प्रकारचे पाऊल उचलले जाईल असे काट्ज यांनी स्पष्ट केले आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी आमचा देश 28 मेपासून पॅलेस्टाइनला मान्यता देणार असल्याचे जाहीर केले आहे.

आमच्या लक्ष्यासाठी दृढ : इस्रायल

आयरिश-नॉर्वेजियन मूर्खपणा आम्ही रोखू शकत नाही. आम्ही आमच्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी दृढ आहोत. आमच्या नागरिकांसाठी सुरक्षा बहाल करणे, हमासला संपविणे आणि ओलिसांच्या मुक्ततेचे आमचे लक्ष्य आहे. याहून महत्त्वाचे आमच्यासाठी काहीच नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

तीन देशांमध्ये काय घडले?

स्पेनचे पंतप्रधान सांचेझ यांनी बुधवारी संसदेला संबोधित केले. स्पॅनिश लोकांच्या बहुमताला विचारात घेत आगामी मंगळवारी (28 मे) रोजी स्पेनचे मंत्रिमंडळ पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार आहे. शांतता, न्याय आणि सुसंगतीसाठी आता कृती करण्याची वेळ आली असल्याचे सांचेझ यांनी म्हटले आहे. तर आयरिश पंतप्रधान सायमन हॅरिस यांनी इस्रायल, पॅलेस्टाईन आणि त्यांच्या लोकांदरम्यान शांतता आणि सुरक्षेसाठी द्विराष्ट्र तोडगा हाच एकमात्र विश्वासार्ह मार्ग असल्याचे नमूद केले आहे. आज (बुधवार) आयर्लंड पॅलेस्टाईनला देशाच्या स्वरुपात मान्यता देत आहे. ही मान्यता मध्यपूर्वेत शांतता आणि तडजोड घडविण्यात योगदान देईल असे वक्तव्य हॅरिस यांनी केले. आमचा देश शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल या अपेक्षेसोबत पॅलेस्टाईनला मान्यता देत असल्याचे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोएरे यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article