आयर्लंडची पहिल्या डावात 108 धावांची आघाडी
एकमेव कसोटी दुसरा दिवस : दिवसभरात 9 बळी, अफगाण दु. डाव 3 बाद 134
येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीत अफगाण विरुद्ध आयर्लंडने आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर अफगाणने दुसऱ्या डावात 3 बाद 134 धावा जमवित 26 धावांची बढत मिळविली आहे. तत्पूर्वी आयर्लंडने पहिल्या डावात 108 धावांची आघाडी मिळविली होती. गुरुवारी दिवसभरात 9 गडी बाद झाले. या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 155 धावांत आटोपला. सलामीच्या इब्राहिम झद्रनने 83 चेंडूत 9 चौकारांसह 53 तर करिम जेनतने 78 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 41, कर्णधार शाहिदीने 4 चौकारांसह 20 तसेच नावेद झद्रनने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेर सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 39 धावात 5 गडी बाद केले. क्रेग यंग आणि कॅम्फर यांनी प्रत्येकी 2 तसेच मॅकार्थीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
अफगाण प. डाव 54.5 षटकात सर्व बाद 155 (इब्राहिम झद्रन 53, शाहिदी 20, करिम जेनत नाबाद 41, नावेद झद्रन 12, अवांतर 11, मार्क अॅडेर 5-39, यंग 2-31, कॅम्फर 2-13, मॅकार्थी 1-28), आयर्लंड प. डाव 83.4 षटकात सर्व बाद 263 (कॅम्फर 49, टेक्टर 32, स्टर्लिंग 52, टकेथ 46, मॅकब्राईन 38, अॅडेर 15, मूर 12, अवांतर 10, झिया उर रेहमान 5-64, नावेद झद्रनने 3-59, मसूद 1-38, झहिर खान 1-67), अफगाण दु. डाव 37 षटकात 3 बाद 143 (इब्राहिम झद्रनने 12, नूरअली झद्रनने 32, रेहमत शहा 9, शाहिदी खेळत आहे 53, गुरबाज खेळत आहे 23, अवांतर 5, अॅडेर 2-23, मॅकार्थी 1-25).