‘आयआरसीटीसी’चे तिमाही निकाल घोषित
07:00 AM Nov 10, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयआरसीटीसीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. आयआरसीटीसीचा निव्वळ नफा वार्षिक 30.36 टक्क्यांनी वाढून 294.67 कोटी रुपये झाला आहे. महसूल 23.51 टक्क्यांनी वाढून 995.31 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत आयआरसीटीसीने 226.03 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील कामकाजातील महसूल वार्षिक 23.51 टक्क्यांनी वाढून 995.31 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ते 805.80 कोटी रुपये होते. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा वार्षिक 20.2 टक्केने वाढून 366.5 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 304.9 कोटी रुपये होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article