For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या सर्वोच्च नेत्याने निवडला उत्तराधिकारी

06:19 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या सर्वोच्च नेत्याने निवडला उत्तराधिकारी
Advertisement

आजारी खामेनेईंकडून स्वत:च्या पुत्राची निवड

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणने गुप्तपणे स्वत:चे सर्वोच्च नेते  अयातुल्ला अली खामेनेई यांच्या उत्तराधिकारीची निवड केली आहे. आजारी असलेले 85 वर्षीय अली खामेनेई यांचे दुसरे पुत्र मोजतबा खामेनेई यांची तेहरानमध्ये देशाचे पुढील प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पर्शियन भाषेतील आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम इराण इंटरनॅशनलने याविषयी वृत्त प्रकाशित केले आहे. यानुसार गंभीर आजारी असलेले इराणचे सर्वोच्च नेते लवकरच पद सोडू शकतात. म्हणजेच मोजतबा हे स्वत:च्या पित्याच्या हयातीतच हे पद स्वीकारू शकतात.

Advertisement

इराणच्या तज्ञांच्या सभेच्या 60 सदस्यांनी 26 सप्टेंबर रोजी अली खामेनेई यांच्या मागणीनुसार एक असाधारण बैठक बोलाविली होती. या बैटकीत सदस्यांना कुठल्याही पूर्वसुचेनशिवाय आणि कठोर गोपनीयतेच्या अंतर्गत त्वरित उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवर निर्णय घेण्याचा निर्देश देण्यात आला होता. प्रारंभिक विरोधानंतरही अखेर बैठकीत उपस्थित सदस्यांनी मोजतबा यांना सर्वसंमतीने उत्तराधिकारी घोषित पेले आहे. कथितपणे नेत्याची निवड करण्यासाठी संबंधित सदस्यांना धमकाविण्यात आले होते.

 माहिती गुप्त ठेवण्याचा इशारा

सदस्यांना बैठकीचा तपशील गुप्त ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. या बैठकीसंबंधी माहिती उघड केल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली होती. व्यापक जनविरोधाच्या भीतीने ही खबरदारी सर्वोच्च नेत्याकडून बाळगण्यात आली होती. बैठकीचा तपशील 5 आठवड्यांपर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून मोजतबा यांना पित्याचा वारसा सांभाळण्यासाठी तयार केले जात होते.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई हे स्वत:च्या हयातीतच पुत्राकडे देशाची धुरा सोपवू शकतात. सहज हस्तांरणाच्या तयारीसाठी पावले उचलता यावीत म्हणून हा निर्णय घेतला जाणार आहे. खामेनेई मोजतबा यांच्या नेतृत्वाला सुरक्षित करणे आणि कुठल्याही प्रकारचा विरोध उभा ठाकल्यास तो मोडून काढू शकतात

Advertisement
Tags :

.