महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायलवर हल्ल्याचे इराणकडून समर्थन

06:44 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Flames rise from Israeli airstrikes in Dahiyeh, Beirut, Lebanon, Friday, Oct. 4, 2024. (AP/PTI) (AP10_04_2024_000006B)
Advertisement

धार्मिक नेत्यांचे पाच वर्षात प्रथमच ‘सर्मन’, इस्रायलने वाढविली हल्ल्यांची व्याप्ती

Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

मध्यपूर्वेत भडकलेल्या इस्रायल-इराण संघर्षाच्या संदर्भात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातोल्ला अली खमेनी यांनी प्रथमच भाष्य केले आहे. त्यांनी 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इराकवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले असून, तीन दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर केलेले क्षेपणास्त्र हल्ल्याचेही समर्थन केले आहे. हिजबुल्ला कधीही इस्रायलसमोर मान तुकविणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. इस्रायलने मात्र, हिजबुल्लावरील आपल्या हल्ल्यांची धार अधिक तीव्र केली आहे. अमेरिकेकडून युद्धाची व्याप्ती वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात असून दोन्ही देशांशी अमेरिकेचे प्रतिनिधी प्रदीर्घ चर्चा करीत आहेत.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातोल्ला अली खमेनी यांनी गेल्या पाच वर्षात प्रथमच शुक्रवारी इराणच्या मुख्य मशिदीत नमाजाचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाला उद्देशून संदेशही (सर्मन) दिला. इस्रायल आपल्या विरोधात कधीही जिंकू शकत नाही. इस्रायल फार काळ टिकणार नाही. हिजबुल्लाच्या हस्तकांचे हौतात्म्य फुकट जाणार नाही. इस्लामच्या शत्रूंना त्यांच्या कृतीची शिक्षा मिळेलच, अशा शब्दांमध्ये त्यांनी इस्रायलसंबंधीचा संताप व्यक्त केला.

नसराल्लाची प्रशंसा

गेल्या आठवड्यात इस्रायलने हिजबुल्लाचा प्रमुख नसराल्ला याला ठार केले होते. खमेनी यांनी नसरल्लाची प्रशंसा आपल्या संदेशात केली. तो इस्लामचा शूर वीर होता. त्याला अन्यायाने मारण्यात आले आहे. त्याने हिजबुल्लाच्या वाढीसाठी आणि अन्यायाच्या विरोधात लढताना आपले प्राण गमावले आहेत. हिजबुल्लाच्या पाठीशी जगातील सर्व मुस्लीम आहेत. इस्रायल हा मुस्लीमांचा समान शत्रू आहे. त्याचा नायनाट करु, अशी अनेक वक्तव्ये खमेनी यांनी त्यांच्या संदेशात केली आहेत.

इस्रायलचे हल्ले सुरुच

गुरुवारी आणि शुक्रवारी इस्रायली विमानांनी लेबनॉनच्या हिजबुल्ला प्रभावाखालील भागांवर आणखी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाच्या 9 हस्तकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायलने आपल्या सीमेतील आणखी 20 नगरांमधील नागरिकांना काही काळापुरते सुरक्षित स्थानी जाण्याचा आदेश दिला असून ही नगरे रिकामी केली जात आहेत. इस्रायलच्या सैन्याने उत्तर सीमा ओलांडून दक्षिण लेबनॉवर कारवाई सुरुच ठेवली आहे.

रेल्वे संपर्क तोडला

लेबनॉन आणि सीरिया यांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर इस्रायली युद्ध विमानांनी हल्ला केला असून त्यामुळे या दोन देशांमधील रेल्वे संपर्क तुटल्याचे वृत्त आहे. एक रेल्वेमार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्याच्या दुरुस्तीचे काम लेबनॉनने हाती घेतले आहे. लेबनॉनच्या अधिकृत सैन्यावरही इस्रायलच्या विमानांनी हल्ला केला.

इस्रायलवर अग्निबाणांचा मारा

हिजबुल्लानेही इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना उत्तर इस्रायलमध्ये अनेक अग्नीबाणांचा मारा केला. तथापि, इस्रायलच्या आयर्न डोम व्यवस्थेने यांपैकी बहुतेक अग्नीबाण निकामी केल्याने त्याची कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. इस्रायलने आता आपल्या हल्ल्याची व्याप्ती वाढविली असून हिजबुल्लाच्या आणखी नेत्यांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे.

अणुहल्लाही निकामी करण्याची क्षमता

इस्रायलची संरक्षण यंत्रणा अत्याधुनिक आणि भक्कम आहे, हे या संघर्षात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इराणने बुधवारी इस्रायलवर 200 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. पण त्यांच्यातील केवळ दोनच क्षेपणास्त्रांचा भूमीवर स्फोट झाला. त्यातून इस्रायलची कोणतीही हानी झाली नाही. इराणने आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने इस्रायलवर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी, इस्रायलची संरक्षण यंत्रणा हा हल्ला निकामी करू शकते असे तज्ञांचे मत आहे. इराण आणखी क्षेपणास्त्रे डागण्याच्या तयारीत असून इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे हा संभाव्य हल्ला परतविण्याची तयारी केली असल्याचेही वृत्त देण्यात आले आहे.

अशीम सफिद्दीही ठार?

हिजबुल्लाचा मुख्य म्होरक्या नसराल्ला याला टिपल्यानंतर त्याचा वारसदार म्हणून नियुक्त केला जाण्याची शक्यता असलेला अशीम सफिद्दी यालाही ठार केल्याचे वक्तव्य इस्रायलकडून करण्यात आले आहे. मात्र, अद्याप हिजबुल्लाकडून या वक्तव्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. तथापि, या संघटनेने या वृत्ताचा इन्कारही केलेला नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण आहे. सफिद्दी याची लवकरच नसराल्ला याच्या स्थानी नियुक्ती केली जाणार होती, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

इराण संघर्षबंदीस तयार?

इराण संघर्षबंदीस तयार आहे, असे वक्तव्य या देशाचे अध्यक्ष मसूद पेझेशखियान यांनी शुक्रवारी केले. आम्हाला युद्ध वाढविण्यात रस नाही. आम्ही शांततेसाठी आणि चर्चेसाठी तयार आहोत. तथापि, इस्रायलच आमच्यावर हल्ले करुन आम्हाला युद्धासाठी उद्युक्त करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दिवसभरात अनेक घडामोडी

ड नसराल्लाचा संभाव्य वारसदार सफिद्दीही इस्रायलच्या हल्ल्यात ठार?

ड इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याकडून इस्रायलवर संदेशात तीव्र टीका

ड इस्रायलच्या हल्ल्यात सीरिया-लेबनॉन रेल्वेमार्ग नष्ट, दुरुस्ती सुरू

ड संघर्ष वाढू नये यासाठी अमेरिकेची दोन्ही देशांशी व्यापक बोलणी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article