कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयक्यूचा गेमिंग स्मार्टफोन नियो लाँच

06:06 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एआय वैशिष्ट्यांसह दाखल : सुरुवातीची किंमत 31,999 रुपये

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

गेमिंग फोन बनवणारी टेक कंपनी आयक्यूने भारतीय बाजारात त्यांचा नवीन शक्तिशाली स्मार्टफोन आयक्यू नियो 10 लाँच केला आहे. हा स्नॅपड्रॅगन 8एस जेन  4 प्रोसेसर आणि 16 जीबी रॅमने सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह येणारा हा भारतातील पहिला फोन आहे. हा एक गेमिंग फोन आहे, तुम्ही 144एफपीएस  वर गेम खेळू शकता.

याशिवाय, फोनमध्ये अनेक एआय वैशिष्ट्यो देखील समाविष्ट आहेत. आयक्यू नियो 10 भारतात 4 प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते आणि 40,999 रुपयांपर्यंत जाते. 3 जूनपासून, त्याची विक्री कंपनीच्या वेबसाइट आणि अॅमेझॉनवर सुरू होईल. सुरुवातीला खरेदी करणाऱ्यांना सवलत असणार आहे. सर्व प्रकारच्या फोनवर 2000 रुपयांची सूट मिळेल.

नियो 10 हा पॉली कार्बोनेट बॉडीवर बनवला आहे, जो फक्त 8.09 एमएम पातळ आहे. त्याच वेळी, या 5जी फोनचे वजन 206 ग्रॅम आहे. हा मोबाईल आयपी 65 प्रमाणित आहे. म्हणजेच, जर तो हलक्या पावसात वापरला तर काहीही होणार नाही. तथापि, आयपी68 आणि आयपी 69 रेटेड फोन आजकाल बाजारात 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. बटन्स आणि पोर्टबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिले आहे. सिम ट्रे तळाशी युएसबी टाइप-सी 2.0 पोर्टसह देण्यात आला आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

मेमरी: मोबाईल एक्सटेंडेड रॅम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे सर्व प्रकारांच्या रॅम पॉवरला दुप्पट करते. म्हणजेच, 8 जीबी रॅम मॉडेलला 16जीबी रॅम आणि 16 जीबी रॅम  मॉडेलला 32 जीबी रॅम मिळणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article