For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

इक्बाल सिंग चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

07:46 PM Mar 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
इक्बाल सिंग चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
Iqbal Singh Chahal Additional Chief Secretary

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी भूषण गगराणी यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाच्या प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती केली. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बुधवारी राज्य सरकारला भुषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्तीचे निर्देश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, केंद्रीय निवडणुक आयोगाने राज्य सरकारला इक्बालसिंह चहल ज्याच्यासह ज्यांनी 3 वर्षाहून अधिक काळ सेवेत आहेत अशा इतर नागरी आयुक्त आणि अतिरिक्त किंवा उपमहापालिका आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले होते.

1989 च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले इक्बाल सिंह चहल यांची 8 मे 2020 रोजी प्रवीण परदेशी यांच्या जागी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. याचबरोबर माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, यांचीही मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात सचिव म्हणून बदली आणि नियुक्ती करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.