या आठवड्यात विविध कंपन्यांचे आयपीओ होणार खुले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालू आठवड्यात विविध कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. मेनबोर्डसह एसएमई प्रकारात आयपीओ खुले होणार आहेत. ऑफिस स्पेससह इलेक्ट्रॉनिक्स फर्म व रियल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट यांच्या आयपीओचा समावेश असणार आहे.
ब्रिगेड हॉटेल
ब्रिगेड समुहाचा विस्तार हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दिसतो. ब्रिगेड हॉटेलचा आयपीओ 24 ते 28 जुलैपर्यंत सबस्क्रीप्शनकरीता खुला होणार आहे. कंपनी आयपीओतून 759 कोटी रुपये उभारणार आहे. 31 जुलैला समभाग बीएसई, एनएसईवर सुचीबद्ध होऊ शकतो.
इंडिक्युब स्पेसेस
इंडिक्युब स्पेसेस यांचा आयपीओ 23 जुलैला खुला होणार असून 25 पर्यंत खुला राहणार आहे. या आयपीओतून कंपनी 700 कोटी रुपये उभारणार असून इशुची किंमत 225-237 रुपये प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. 30 जुलै रोजी समभाग बीएसई, एनएसईवर सुचीबद्ध होतील.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स
हा कंपनीचा समभाग 23 जुलैला खुला होणार असून या आयपीओतून कंपनी 460 कोटी रुपये उभारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात कंपनी कार्यरत असून 225-237 रुपये प्रति समभाग इशु किमत निश्चित करण्यात आलीय. 30 जुलैला समभाग सुचीबद्ध होतील.
इतर कंपन्यांचे आयपीओ
याखेरीज प्रॉपशेअर टायटानिया रीट यांचा 473 कोटी रुपयांचा आयपीओ येणार असून 21 जुलैला गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. यात 25 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येईल. शांती गोल्ड इंटरनॅशनल यांचा आयपीओ 25 जुलैला खुला होऊन 29 तारखेला बंद होईल. अभियांत्रिकी घटक बनवणाऱ्या स्वस्तिका कास्टल यांचा आयपीओ 21 जुलैपासून 23 जुलैपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला आहे. शेअरबाजारात पाहता बीएसई एसएमईवर 28 जुलैला समभाग सुचीबद्ध होईल. 14 कोटी रुपये कंपनी उभारणार आहे. बांधकाम क्षेत्र व पायाभूत सुविधा क्षेत्रातील सेव्ही इन्फ्रा यांचा आयपीओ 21 जुलैला खुला झालाय. 69 कोटी रुपये आयपीओतून उभारले जाणार असून 23 जुलै रोजी गुंतवणूकीसाठी आयपीओ बंद होणार आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 5524 कोटी
नवी दिल्ली : ा़विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये आतापर्यंत 5524 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार शुल्काच्या बाबतीमध्ये असलेला तणाव त्याचप्रमाणे इतर कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार काहीसे सावध राहिलेले पाहायला मिळाले. 18 जुलैपर्यंत पाहता 5524 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले आहेत. जूनमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 14590 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.