For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोपाल स्नॅक्स’चा आयपीओ खुला

06:03 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गोपाल स्नॅक्स’चा आयपीओ खुला
Advertisement

11 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावण्याची संधी : कंपनी जमा होणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी  वापरणार

Advertisement

नवी दिल्ली :

गोपाल स्नॅक्स लिमिटेडचा आयपीओ बुधवारपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओसाठी 6 मार्च ते 11 मार्च या कालावधीत बोली लावू शकणार आहेत. कंपनीचे समभाग हे 14 मार्च रोजी  भारतीय शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहेत.

Advertisement

या आयपीओच्या मदतीने कंपनी जवळपास 650 कोटी जमा करणार आहे. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलद्वारे 16,209,476 समभागांची विक्री करत आहेत. या आयपीओमधून जमा होणारा पैसा कंपनी कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 481 समभागांसाठी बोली लावू शकतात.

गोपाल स्नॅक्स लिमिटेडने समभागाची किंमत 381-401 निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉटसाठी बोली लावू शकतात उदा. 37 शेअर्स घ्यावे लागतील. याचदरम्यान अँकर गुंतवणूकदारांनी 194 कोटी ऊपयांची उभारणी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांचा इशुत वाटा 50 टक्के, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा 35 टक्के वाटा असणार आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांकडे 15 टक्के इतका वाटा राखीव असेल.

Advertisement
Tags :

.