आरसीबी-केकेआर सामन्याने आज ‘आयपीएल’ पुन्हा सुरू
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अलीकडच्या भारत-पाकिस्तान तणावामुळे थांबवाव्या लागलेल्या आयपीएलची शनिवारी पुन्हा सुऊवात होईल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष नुकत्याच कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीवर असेल.
10 दिवसांच्या अनपेक्षित विश्रांतीनंतर आरसीबी आणि केकेआर दोघांनाही वेगवेगळी ध्येये साध्य करायची आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हानेही आहेत. आरसीबी 11 सामन्यांत 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आज येथे विजय मिळवल्याने ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. केकेआर 12 सामन्यांत 11 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि एक चूक गतविजेत्या संघाच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळवेल. यजमान संघ चार सामन्यांतील विजयाच्या मालिकेनंतर येथे उतरणार आहे, तर पाहुण्या संघाने लीग तात्पुरती थांबण्यापूर्वी तीन सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. मध्ये पडलेल्या खंडानंतर संघ पुन्हा स्पर्धात्मक आघाडी मिळवू शकतील का यासंदर्भात प्रश्न उपस्थित झालेला आहे.
परंतु या अडचणींवर मात करण्याच्या बाबतीत आरसीबी चांगल्या स्थितीत आहे आणि कर्णधार रजत पाटीदार जाळ्यात सरावावेळी चांगली फलंदाजी करत असल्याचे पाहून अनेकांना दिलासा मिळालेला असेल. चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या घरच्या सामन्यात पाटीदारच्या बोटाला दुखापत झाली होती. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावेळी मायदेशी परतलेले यजमान संघाचे बहुतेक परदेशी खेळाडूही मैदानात उतरणार आहेत. फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रोमॅरियो शेफर्ड हे या सामन्यासाठी आणि त्यानंतरही उपलब्ध आहेत. दुखापतीमुळे देवदत्त पडिक्कल आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांची अनुपस्थिती ही आरसीबीसाठी धक्कादायक बाब असेल. पडिक्कलच्या जागी आलेला मयंक अग्रवाल या संधीचा फायदा घेईल अशी आशा आरसीबीला असेल. हेझलवूडला खांद्याला दुखापत झाली आहे आणि संघाने त्याच्या उपलब्धतेबद्दल अद्याप चित्र स्पष्ट केलेले नाही.
या आठवड्याच्या सुऊवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या कोहलीचा आजच्या सामन्यात सर्वांत जास्त जयजयकार होण्याची अपेक्षा आहे. हा 36 वर्षीय खेळाडू उर्वरित आयपीएलमध्ये काही प्रभावी खेळी करण्यास उत्सुक असेल. दुसरीकडे, केकेआरसाठी या हंगामात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि तऊण अंगक्रिश रघुवंशी यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या कोणत्याही फलंदाजाने सातत्याने योगदान दिलेले नाही. वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी आणखी थोडे जास्त योगदान दिलेले त्यांना हवे असेल. तथापि, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांचा समावेश असलेल्या केकेआरच्या गोलंदाजी विभागाने कधी कधी ते महागडे ठरले, तरी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. मात्र त्यांना इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अलीची अनुपस्थिती जाणवेल, जो विषाणूजन्य तापाने आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

चिन्नास्वामीच्या खेळपट्टीची आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना साथ मिळालेली आहे आणि कधी कधी फिरकी गोलंदाजांनाही अनपेक्षित मदत मिळालेली आहे. परंतु मध्यंतरी पडलेला खंड आणि जवळ पोहोचणाऱ्या पावसाळ्याचे सावट यांचा खेळपट्टीवर परिणाम झालेला असून शकतो. यामुळे संघांना त्यांची रणनीती पुन्हा आखावी लागेल.
संघ-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, लवनीथ सिसोदिया, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, वऊण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, एनरिक नॉर्टजे, स्पेन्सर जॉन्सन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.