कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

IPL 2025 Suspended : पुढील एक आठवड्यासाठी IPL स्थगित, BCCI ची अधिकृत घोषणा

01:27 PM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर BCCI ने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

IPL 2025 Suspended : पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी एअर स्ट्राईक केला.  भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. भारत-पाकिस्तानमधील या वाढत्या तणावामुळे देशातील महत्वाच्या शहरांतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL स्पर्धेच्या अनिश्चित स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे BCCI ने IPL 2025 ही स्थगिती दिली होती. दरम्यान, आता BCCI ने देशातील IPL चे सामने हे पुढील एका आठवड्यासाठी स्थगित करणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील, असे BCCI ने स्पष्ट केले आहे. 

आज (9 मे) रोजी बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून आयपीएलचा कोणताही सामना होणार नाही. याशिवाय आता विदेशी खेळांडून सुखरुप घरी पाठवणे ही बीसीसीआयची पहिली प्राथमिकता असणार आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नवीन तारखा जाहीर केल्या जातील असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याचं दिसून येतं आहे. भारताने 8 हजारांहून अधिक एक्स अकाऊंट्स बंद केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता.

त्यामुळे आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आज BCCI ने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. IPL 2025 चे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांचे मत जाणून घेतल्यानंतर सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Tags :
#Indian Army#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBCCIIndia Pakisatan warIPL 2025IPL 2025 SuspendedOperation Sindoor
Next Article