For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय बाजारात आयफोनची हिस्सेदारी 10 टक्क्यांच्या घरात

06:49 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय बाजारात आयफोनची हिस्सेदारी 10 टक्क्यांच्या घरात
Advertisement

तिसऱ्या तिमाहीत विक्रमी विक्री

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

चालू वर्ष 2025 मधील जुलै ते सप्टेंबरच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये  भारतीय बाजारात स्मार्टफोन क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी अॅपल यांच्या आयफोनची विक्री ही सर्वाधिक झाली आहे. या मजबूत विक्रीच्या मदतीने स्मार्टफोनच्या वर्गवारीत अॅपलची बाजारातील हिस्सेदारी ही 10.4 टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. तिसरी तिमाही ही अॅपलसाठी महत्त्वाची राहिली आहे, कारण वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाही वेळी भारतामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक किरकोळ विक्री वाढून ती 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. अशी कामगिरी करत अॅपलने पहिल्यांदाज चौथे स्थान प्राप्त केले आहे.   आयडीसी इंडियाचे उपासन जोशी यांनी म्हटले आहे की, 2025 मध्ये अॅपल 1.5 कोटींच्या विक्रीचा अंदाज आहे. जो दोन अंकांची मजबूत आकडेवारी सादर करणार असल्याचेही नमूद केले आहे.

Advertisement

 दोन मॉडेलची चलती

अॅपलने दोन नवीन डिझाईन केलेल्या आयफोनने वर्षाच्या आधारे जवळपास 25.6 टक्क्यांची जोरदार वाढ प्राप्त केली आहे. तिमाहीत आयफोन-16 भारतामध्ये सर्वाधिक किरकोळ विक्रीत मजल मारलेला आयफोन राहिला आहे. नुकताच सादर झालेला आयफोन-17 देखील लोकप्रिय झाला असून नवीन विक्रीचे आकडे मोडीत काढत आहे.

Advertisement
Tags :

.