For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयफोन, आयपॅड धारकांनो सावधान !

06:00 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयफोन  आयपॅड धारकांनो सावधान
Advertisement

व्यक्तिगत माहिती हॅक होण्याचा धोका : सुरक्षिततेसंबंधात केंद्र सरकारकडून इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अॅपलचा आयफोन, आयपॅड आणि मॅक यांचा उपयोग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या ‘दी इंडियन काँप्युटर इमर्जन्सी टीम’ या संस्थेने हा इशारा दिला आहे. अॅपलच्या या साधनांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होऊ शकतात. तसेच या साधनांमध्ये साठविलेली माहिती किंवा व्यक्तिगत माहिती हॅक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

अॅपलच्या ज्या साधनांना धोका आहे, त्यांच्यात अत्याधुनिक आयफोन 15 प्रो मॅक्सचाही समावेश आहे. याशिवाय, व्हीजन प्रो हेडसेट, आय पॅड प्रो, आयपॅड आदी साधनांनाही हा धोका आहे. या साधनांमधील सॉफ्टवेअरमधील त्रुटी हेरण्यात सायबर हल्लेखोरांना यश आले आहे. त्यामुळे ते अशा साधनांमधील माहिती सहजगत्या हस्तगत करु शकतात, अशी सूचना देण्यात आली आहे.

काय करण्याची आवश्यकता

अॅपल साधनांच्या धारकांनी त्यांची साधने लवकरात लवकर अपडेट करुन घेण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या साधनांसंबंधी धोक्याची सूचना देण्यात आलेली आहे, त्यांच्या अपग्रेडेशनची व्यवस्था करणे हा योग्य उपाय ठरणार आहे. सायबर हल्ल्ल्याचा धोका अॅपलच्या जुन्या मॉडेल्सनाही आहे. त्यांच्यात आयफोन 8, आयफोन 8 प्लस आदी साधनांचा समावेश आहे. या साधनांच्या धारकांनीही हा धोका वेळेवर ओळखून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व आयफोन धारकांना हे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

.