आयफोन-17 होणार लाँच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहु प्रतिक्षित अॅपल आयफोन-17 भारतीय बाजारामध्ये उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबरमध्ये सदरचा आयफोन भारतीयांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनी आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे मॉडेल्स सादर करणार आहेत. यामध्ये वायफाय चीप असणार असून 6.3 इंचांचा ओएलईडी स्क्रीनही असेल. या आयफोनची किंमत भारतात 80 हजारांच्या आसपास असणार आहे, अशीही माहिती मिळते आहे.
कधी येणार, वैशिष्ट्यो
सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सदरचा आयफोन भारतात लाँच केला जाईल. या आयफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला असून 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आलेला आहे. 8 जीबी रॅम सोबत आयफोन सादर केला जाणार असून वायरलेस चार्जिंग सुविधेसोबतच ए 19 ची चीप देण्यात आली आहे. स्टील ग्रे, लाईम, स्काय ब्ल्यू आणि पर्पल या रंगांमध्ये हा आयफोन बाजारात येणार आहे.