For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयओएस सागर’ला हिरवा कंदील

11:52 PM Apr 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘आयओएस सागर’ला हिरवा कंदील
Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते कारवार नौदल तळावर विविध प्रकल्पांचे उद्घाटन

Advertisement

प्रतिनिधी/कारवार

दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठीत व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा येथील सीबर्ड नाविकदल प्रकल्प शनिवारी काही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी येथे आयएनएस सुनयना म्हणजेच ‘आयओएस सागर’ (सेक्युरिटी ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) या नौकेला एका दिमाखदार सोहळ्यात हिरवा झेंडा दाखविला. ‘आयएनएस सुनयना’शी जोडलेल्या या जहाजावर नऊ देशांच्या नौदलातील 44 अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत.

Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी कर्नाटकमधील कारवार येथील नौदल तळाला भेट दिली. याप्रसंगी सीबर्ड प्रकल्प प्रदेशात 2,000 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आधुनिक ऑपरेशनल रिपेअर आणि लॉजिस्टीक्स सुविधांचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण, चिफ ऑफ द नेवल स्टाफ अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, डिफेन्स सेक्रेटरी राजेशकुमार सिंग यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

5 मार्च 1919 मध्ये भारताच्या पहिल्या मर्चंट जहाजाने मुंबईहून लंडनपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे 5 मार्चला भारतीय नाविक दलात एक ऐतिहासिक महत्त्व आहे, असे स्पष्ट करून राजनाथ सिंग म्हणाले, भारतासह केनिया, मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, टांझानिया, कोमोरोस, मोझंबिक, सेचेल्स आणि मादागास्कर या एकूण दहा देशातील 44 खलाशी आयएनएस सुनयना या नौकेतून प्रवास करणार आहेत. हे खलाशी आपल्या प्रवासादरम्यान दार-इस-सलाम, पोर्ट लुईस आणि पोर्ट व्हिक्टोरियाला भेटी देणार आहेत. हे खलाशी कोची येथील प्रोफेशनल ट्रेनिंग स्कूलमधून देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा सराव करणार आहेत. यामध्ये फायर फायटींग डॅमेज कंट्रोल, व्हिजीट बोर्ड सर्व ग्रॅण्ड सिझर, ब्रिज ऑपरेशन्स, इंजिन रुम मॅनेजमेंट, स्वीचबोर्ड ऑपरेशन्स आणि बोट हॅण्डलींगचा सराव करणार आहेत. या सरावामुळे इंडियन नेव्ही आणि आंतरराष्ट्रीय भागिदारांमधील इंटर ऑपराबिलिटीमध्ये सुधारणा होणार आहे, असे स्पष्ट केले.

येथे खलासी आणि नागरिकांच्या वास्तव्यासाठी 480 ड्वेलिंग युनिट्स आणि पूरक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 25 कि.मी. रोड नेटवर्क, 12 कि.मी. लांब स्टॉर्मवॉटर डेनेज, पाणीसाठे, वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प आणि सुरक्षितता टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. येथील मुलभूत सुविधा सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. सीबर्ड प्रकल्पामुळे येथील औद्योगिक विकासाला बळ मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे.

आयओएस सागर हे एक भारताचे शांती, भरभराट आणि सामुहिक सेक्युरिटीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. ते बंधुत्वाचे आणि शेअर इंटरेस्टचे सिंबॉल आहे. भारतीय नाविक दलासह अन्य नऊ देशातील 5 नाविक दल सुदृढ अर्थव्यवस्था आणि मिलिटरी पॉवरच्या जोरावर अन्य देशातील नाविक दलाना चिरडण्याचा प्रयत्न करणार नाहीत, असे प्रतिपादनही संरक्षणमंत्र्यांनी केले.

Advertisement
Tags :

.