महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण

08:06 PM Dec 16, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

खासदार धनंजय महाडिक : सहकुटुंब सदिच्छा भेट : करवीर निवासिनी अंबाबाईसह कोल्हापुरी वैशिष्ठ्यांची दिली माहिती

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. या भेटीत खासदार महाडिक यांनी राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे आमंत्रण दिले. कोल्हापूर जिह्याची ऐतिहासिक परंपरा, संपन्न वारसा, कला- क्रीडा- कृषी- उद्योग क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी याबद्दल खासदार महाडिक यांनी राष्ट्रपती मुर्मु यांना माहिती दिली.

सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि कोल्हापुरी गूळ - साज - चप्पल यासह विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या परंपरांची, खासदार महाडिक यांनी माहिती दिली. तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अत्यंत आस्थेने महाडिक परिवाराशी संवाद साधला आणि कोल्हापूरच्या इतिहास परंपरांची माहिती जाणून घेतली. यावेळी अरुंधती महाडिक यांनी भागीरथी संस्थेमार्फत सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती दिली. जिह्यातील सुमारे 20 हजार महिलांना प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भागीरथी संस्थेच्या माध्यमातून यश आल्याचे सांगितले. शासकीय योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली. दरम्यान, महाडिक परिवार आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचा करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, चिरंजीव अमरेंद्र महाडिक, विश्वराज आणि कृष्णराज महाडिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
droupadimurmuInvitationkolhapurmahadikmunnamahadikpresident
Next Article