महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाबरी खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारींनाही निमंत्रण

06:03 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

बाबरी मशिद खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांनाही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सिंह यांनी इक्बाल अन्सारी यांच्या निवासस्थानी जात त्यांना निमंत्रणपत्र दिले. निमंत्रणपत्र मिळाल्यानंतर इक्बाल अन्सारी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यापूर्वी भूमिपूजन कार्यक्रमातही त्यांना निमंत्रित केल्यानंतर त्यांनी सहभाग नोंदवला होता.

Advertisement

बाबरी प्रकरणात इक्बाल अन्सारी पक्षकार होते आणि मंदिरासाठी ही जमीन देण्याच्या विरोधात होते. त्यासाठी ते न्यायालयात खटला लढत होते. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत पोहोचले असताना त्यांचे स्वागत केले होते. तसेच गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यावेळी झालेल्या रोड शोमध्ये ते पंतप्रधानांवर पुष्पवर्षाव करताना निदर्शनास आले होते. याप्रसंगी ‘अयोध्येत हिंदू आणि मुस्लीम सर्व एकत्र राहतात आणि एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात’, असा संदेश देण्याच्या उद्देशाने आपण येथे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

अयोध्या विमानतळाला ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा

नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या अयोध्या येथील विमानतळाला ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले होते. या विमानतळावरील प्रायोगिक चाचण्या पूर्ण झाल्या असून आता येत्या आठवड्यात देशांतर्गत विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. 22 जानेवारी रोजी राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे देश-विदेशातील भाविकांचा ओघ वाढणार असल्याने येथे भव्य-दिव्य विमानतळ साकारण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article