For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरकोळ महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदार निराश

06:13 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरकोळ महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदार निराश
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 153 अंकांनी घसरला, तर निफ्टी 25,057 वर बंद झाला आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून चढ-उतार सुरूच आहेत. यामध्ये सोमवारी पहिल्या सत्रात बाजार वधारला मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा शेअर बाजार घसरल्याची नोंद झाली आहे. यावेळी धातू आणि वाहन क्षेत्रांमधील समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात घसरण झाली.

याशिवाय सप्टेंबरमधील किरकोळ महागाईचे आकडे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. यामुळे व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे.

Advertisement

बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर 0.19 टक्क्यांनी म्हणजेच 152.93 अंकांनी घसरून 81,820.12 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला एनएसईचा निफ्टी-50 देखील 0.28 टक्क्यांसोबत 70.60 अंकांच्या घसरणीसह 25,057.35 वर बंद झाला.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीकडे पाहता बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक 2.73 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, कोटक बँक, नेस्ले इंडिया, मारुती आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग घसरणीत राहिले. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक 1.90 टक्क्यांवर बंद झाले. याशिवाय भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अल्ट्रा सिमेंट, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स या कंपन्यांचे समभाग वधारले.

बाजारातील घसरणीचे कारण?

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांसारख्या समभागांचे निर्देशांकात मोठे वजन आहे, यांच्या कमकुवत कामगिरीचा परिणाम बाजारावर हमखास दिसत असतो. यामुळे गुंतवणूकदारांसाठी व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.49 टक्क्यांवर पोहोचली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 5.02 टक्के होता. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.