कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिनाअखेरीस गुंतवणूकदारांची सावध भूमिका

07:00 AM Feb 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक संमिश्र स्थितीचाही परिणाम :  बँकिंग क्षेत्र तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक काहीसे स्थिर राहिले. यामध्ये वाहन क्षेत्रतील तोट्याला आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमधील तेजीने काहीसा आधार दिला. जागतिक संकेतांमध्ये संमिश्र प्रभाव राहिल्याने  काहीशी मंदावलेली आणि दिशाहीन स्थिती  राहिली. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 10.31 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.01 टक्क्यांसह वाढून तो 74,612.43 वर बंद झाला, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा मात्र 2.50 अंकांनी घसरुन निर्देशांक 22,545.05 वर बंद झाला आहे. यावेळी बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 4.11 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 393.10 लाख कोटी रुपयांवर आले.

रिझर्व्ह बँकेने लहान कर्जदार आणि बिगर बँक कर्जदारांसाठी कर्ज देण्याचे नियम शिथिल केल्यानंतर वित्तीय समभाग 0.5 टक्क्यांनी वाढले. यामुळे कर्ज प्रवाह सुधारण्याची आणि व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. बंधन बँकेने 1.2 टक्के वाढ नोंदवली, तर बजाज फायनान्सने 2.4 टक्क्यांची वाढ नोंदवली. याउलट, वाहन समभाग हे 1.6 टक्क्यांनी प्रभावीत झाले. ज्यामुळे दोन दिवसांच्या तेजीचा प्रवास खंडित झाला. वायर आणि केबल्स व्यवसायात अनपेक्षित प्रवेशाची घोषणा केल्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट जूनच्या सुरुवातीपासून 5 टक्क्यांनी घसरून त्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. ज्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

तज्ञांचे मत

मायक्रोफायनान्स संस्था आणि एनबीएफसींसाठी कर्ज देण्याचे नियम शिथिल करण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे वित्तीय क्षेत्रातील आशावादामुळे देशांतर्गत इक्विटीचे मुख्य निर्देशांक मोठ्या प्रमाणात अपरिवर्तित राहिले, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी म्हटले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article