For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इक्विटी म्युच्युअल फंडात 3 वर्षात 1.55 पटीने गुंतवणूक वाढली

06:41 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
इक्विटी म्युच्युअल फंडात 3 वर्षात 1 55 पटीने गुंतवणूक वाढली
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

मागील तीन वर्षांतील इक्विटी म्युच्युअल फंडांच्या एसआयपी कामगिरीचे विश्लेषण केले आणि असे आढळले की सुमारे 12 फंडांनी या कालावधीत गुंतवणूकदारांच्या एसआयपी गुंतवणुकीत 1.55 पट वाढ नोंदवली आहे. उपलब्ध अहवालानुसार, बाजारात तीन वर्षे पूर्ण केलेल्या 228 इक्विटी म्युच्युअल फंडांपैकी यातील 12 फंडांनी त्यांची संपत्ती अनेक पटींनी वाढवली आहे.

म्युच्युअल फंडातील टॉपर्स यादीतील दोन टॉपर्स क्वांट म्युच्युअल फंडाचे होते. क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड यांनी एसआयपी गुंतवणूक अनुक्रमे 1.71 पट आणि 1.65 पट वाढवली.

Advertisement

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड

या मिडकॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत 35.79 टक्केच्या एक्सआयआरआरसह एसआयपी गुंतवणुकीत 1.64 पट वाढ केली आहे. क्वांट लार्ज आणि मिड कॅप फंड या मोठ्या आणि मिडकॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीत 1.59 पट वाढ केली आहे. चार फंडांनी एसआयपी गुंतवणूक 1.58 पटीने वाढवली आहे. बंधन स्मॉल कॅप फंड, जेएम व्हॅल्यू फंड, फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कॉस फंड आणि निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड यांनी अनुक्रमे 32.68 टक्के योगदान दिले.

एसआयबी लाँग टर्म इक्विटी फंड आणि जेएम फ्लेक्सिकॅप फंड या दोन योजनांनी एसआयपी गुंतवणुकीत 1.57 पट वाढ केली.

क्वांट फ्लेक्सी कॅप फंड

या फ्लेक्सी कॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत सिप गुंतवणुकीत 1.56 पट वाढ केली आहे.

Advertisement
Tags :

.