For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईटीएफद्वारे चांदीमध्ये गुंतवणुकीची संधी

06:05 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईटीएफद्वारे चांदीमध्ये गुंतवणुकीची संधी
Advertisement

सिल्व्हर ईटीएफने मागील वर्षात 10 टक्केपेक्षा अधिकचा परतावा दिला

Advertisement

नवी दिल्ली :

सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंडांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. यामुळे एप्रिलमध्ये चांदीच्या ईटीएफच्या मालमत्तेखालील व्यवस्थापनाने (एयूएम) 5,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. एयूएम हा पैसा आहे जो गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी फंड हाउसना दिला आहे.

Advertisement

सिल्व्हर ईटीएफच्या माध्यमातून समभागांप्रमाणे चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या 1 वर्षात 10 टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सिल्व्हर ईटीएफबद्दलची माहिती

पाहुया.

सर्वप्रथम ईटीएफ म्हणजे काय हे समजून घ्या?

चांदीसारख्या समभागांमध्ये खरेदी करण्याच्या सुविधेला सिल्व्हर ईटीएफ म्हणतात. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, जे स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात. चांदीच्या इटीएफचा बेंचमार्क हा स्पॉट सिल्व्हर किमती असल्याने, तुम्ही चांदीच्या वास्तविक किमतीच्या जवळपासच्या किमतीत ते खरेदी करू शकता.

सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत

ईटीएफद्वारे युनिटमध्ये चांदी खरेदी करा : यामुळे कमी प्रमाणात किंवा एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे चांदी खरेदी करणे सोपे होते. सिल्व्हर ईटीएफच्या 1 युनिटची किंमत सध्या 100 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन त्यात गुंतवणूक सुरू करू शकता.

चांदी सुरक्षित राहते: इलेक्ट्रॉनिक चांदी डिमॅट खात्यात ठेवली जाते ज्यामध्ये फक्त वार्षिक डीमॅट शुल्क भरावे लागते. तसेच मुख्य म्हणजे चोरीची भीती नाही. भौतिक चांदीच्या चोरीच्या धोक्याशिवाय, त्याच्या सुरक्षेवरही खर्च केला जातो.

व्यापाराची सुलभता: सिल्व्हर ईटीएफ कोणत्याही अडचणीशिवाय त्वरित खरेदी आणि विकता येऊ शकतात. जेव्हा तुम्हाला पैशांची अडचण असेल तेव्हा तुम्ही ते विकू शकता.

सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी?

सिल्व्हर ईटीएफ खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये, तुम्ही एनएसई किंवा बीएसईवर उपलब्ध असलेल्या सिल्व्हर ईटीएफची युनिट्स खरेदी करू शकता आणि तुमच्या डिमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून समतुल्य रक्कम कापली जाईल. तुम्ही ग्रो, अपस्टोक्स आणि पेटीएमसारख्या अॅप्सद्वारे विनामूल्य डिमॅट खाते उघडू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा सिल्व्हर ईटीएफ निवडू शकता.

Advertisement
Tags :

.