महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास भरभक्कम परताव्याचे आमिष

11:21 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायबर गुन्हेगारांचा बसवन कुडचीच्या वृद्धाला 21 लाखांचा गंडा

Advertisement

बेळगाव : शेअरबाजारामध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी बसवन कुडची येथील एका वृद्धाला सुमारे 21 लाख रुपयांना गंडा घातला आहे. सायबर क्राईम विभागाकडून  जागृती करूनही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. येथील शहर सीईएन पोलीस स्थानकात बसवन कुडची येथील अशोक हलकर्णी (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना 20 लाख 93 हजारांना गंडविले असून गुन्हेगारांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये त्यांनी रक्कम जमा केली आहे. मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेतल्यानंतर गुन्हेगारांनी संपर्कच बंद केला आहे. दि. 1 मे 2024 रोजी अशोक हे समाजमाध्यम हाताळत होते. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लि. या नावाने समाजमाध्यमावर एक पोस्ट आली. ‘शेअरबाजारात गुंतवणूक करा, दामदुप्पट नफा मिळवा’ अशी ती पोस्ट होती. त्याच्यावर विश्वास ठेवून अशोक यांनी त्यांनी सुचविलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉईन झाले.

Advertisement

दि. 13 मे 2024 ते 28 जून 2024 पर्यंत शेअर खरेदीच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यात 20 लाख 93 हजार रुपये अशोक यांनी जमा केले. त्याच्या बदल्यात जिओजित फायनान्शियल सर्व्हिस लि. अॅप्लिकेशनमध्ये 52 लाख 84 हजार 587 रुपये नफा झाल्याचा आकडा दिसला. ही रक्कम काढता येईना. ही रक्कम काढण्याची इच्छा बोलून दाखविल्यावर वेगवेगळी कारणे देत ‘तुम्ही परत पैसे गुंतवा’ असा सल्ला सायबर गुन्हेगारांकडून आला. आपण फसलो गेलो, हे लक्षात येताच अशोक यांनी शहर सीईएन विभागात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. शेअरबाजारमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून फसवणुकीचे प्रकार नित्याचेच झाले असून अशा प्रकारातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article