महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूजक्लिक प्रकरणी नवलाखांची चौकशी

06:21 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

गाजत असलेल्या न्यूजक्लिक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या एका दलाने शहरी नक्षलवाद फोफावण्याचा आरोप असलेले गौतम नवलाखा यांची मुंबईत साधारणत: साडेचार तास चौकशी केली आहे. नवी मुंबई येथील अगरोळी येथे नवलाखा यांचे वास्तव्य असून त्यांच्या घरी त्यांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली.

Advertisement

नवलाखा सध्या जामीनावर बाहेर आहेत. न्यूजक्लिक ही एक युट्यूब वृत्तवाहिनी असून नवलाखा हे या वृत्तवाहिनीशी संबंधित आहेत, असा आरोप आहे. या वृत्तवाहिनीवर देशविरोधी आणि समाजात फूट पाडणारी वृत्ते प्रसिद्ध केली जातात, असा आरोप असून वृत्तवाहिनीवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये या संदर्भात एफआयआर सादर करण्यात आला असून या वृत्तवाहिनीचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि मानवसंसाधन विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. या वृत्तवाहिनीवर चीनकडून अर्थसाहाय्य बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप असून हे धन या वृत्तवाहिनीकडून गौतम नवलाखा, तीस्ता सेटलवाड, जावेद आनंद, पत्रकार उर्मिलेश, अरात्रिका हलधर, परांजय गुहा आणि अभिसार शर्मा यांना देण्यात आले, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. 2019 मध्ये पुरकायस्थ यांनी पीपल्स अलायन्स फॉर डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझम या संस्थेशी हातमिळवणी करुन त्यावर्षी झालेली लोकसभा निवडणूक उधळण्याचा कट केला होता, असाही आरोप करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article