महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तपास केवळ 3 लोकांपुरता मर्यादित नाही!

06:55 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे वक्तव्य : अप्रत्यक्षपणे भारताला केले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ टोरंटो

Advertisement

भारतासाठी वाँटेड दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा तपास केवळ तीन भारतीय नागरिकांच्या अटकेपुरती मर्यादित नाही, हा तपास जारी आहे. कॅनडा एक नियम अन् कायदा असणारा देश असल्याचे वक्तव्य पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी रविवारी केले आहे. ट्रुडो यांची ही टिप्पणी निज्जरच्या हत्येत कथित सहभागासाठी तीन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आल्याच्या काही दिवसांनी समोर आली आहे. तपासादरम्यान कॅनडाच्या पोलिसांनी शनिवारी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची छायाचित्रे जारी केली आहेत.

भारताच्या तपास यंत्रणेने 2020 मध्ये निज्जरला वाँटेड दहशतवादी घोषित केले होते. तर जून 2023 मध्ये कॅनडाच्या सरे येथील एका गुरद्वाराच्या बाहेर निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कुणीच भारताशी संबंध असल्याचा पुरावा दिलेला नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कॅनडाच्या सरकारकडून करण्यात आलेले आरोप भारताने वारंवार फेटाळले आहेत. हे आरोप निरर्थक आणि राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याचे भारताने म्हटले आहे.

रॉयल ओन्टारियो संग्रहालयात रविवारी आयोजित शीख फौंडेशन ऑफ कॅनडाच्या एका कार्यक्रमात ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची कबुली देत स्वत:च्या भाषणाला सुरुवात केली.

शनिवारी अटक करण्यात आलेल्या तीन जणांच्या सहभागापुरती हा तपास मर्यादित नाही. अनेक कॅनेडियन, विशेषकरून शीख समुदायाचे सदस्य बहुधा अद्यात भीतीत असावेत याची मला कल्पना आहे. प्रत्येक कॅनेडियन नागरिकाला सुरक्षित स्वरुपात राहणे आणि भेदभाव आणि हिंसामुक्त वातावरणात राहण्याचा मूलभूत अधिकार आहे. शांततेत जगण्याचे आणि लोकशाही मूल्ये तसेच न्याय प्रणालीबद्दल स्वत:च्या प्रतिबद्धतेकरता दृढ राहण्याचे आवाहन ट्रुडो यांनी केले आहे.

तर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. भारताकडून इशारा देण्यात आल्यावरही कॅनडाने संघटित गुन्हेगारीशी संबंधित लोकांना व्हिसा जारी करण्याचे सत्र आरंभिले आहे. कॅनडात ‘पाकिस्तान समर्थक’ असलेल्या काही लोकांनी स्वत:ला राजकीय स्वरुपात संघटित केले आहे. तसेच एक प्रभावशाली राजकीय लॉबीने तेथे आकार घेतला असल्याची टीका जयशंकर यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article