राजकारण्याच्या नावाचा तपास सुरूच : अधीक्षक गुप्ता
पणजी : रामा काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी अद्याप कोणत्याही राजकारण्याचे नाव समोर आलेले नाही. परंतु राजकीय नावाचा शोध घेण्यासाठीचा तपास अजूनही सुरू आहे, अशी माहिती उत्तर पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल सोमवारी दिली. पत्रकारांशी बोलताना गुप्ता म्हणाले की, रामाने एका व्यक्तीचे म्हणजेच मिंगेलचे नाव घेतले आहे आणि त्यांच्यासमोर हजर केल्यास ते इतरांना ओळखू शकतील. रामाच्या विधानानुसार मिंगेलने या वर्षाच्या सुरूवातीला आगशी येथे त्याच्यावर दोनदा हल्ला केला होता. पोलिस सर्व उपलब्ध पुरावे गोळा करत आहेत आणि निष्कर्षांच्या आधारे न्यायालयात एक मजबूत आरोपपत्र दाखल करतील. रामा काणकोणकर यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी 6 दुचाकीस्वार हल्लेखोरांच्या गटाने भरदिवसा हल्ला केला आणि रस्त्याच्या मधोमध सोडून दिले. या प्रकरणात पोलिसांनी हिस्ट्रीशीटर झेनिटो कार्दोझोसह 8 जणांना अटक केली आहे.