विशाळगड हिंसाचार प्रकरणी सीआयडी चौकशी करा! जिल्हाधिकारी यांना मुस्लीम समाजाच्यावतीने निवेदन
नांद्रे / वार्ताहर
विशाळगड व गजापूर गावामध्ये मस्जिद व मुसलीम लोकांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई व या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी.आसे लेखी निवेदन नांद्रे नगरीच्या तमाम मुसलीम समाजाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून देण्यात आले.
महाराष्ट्रात हिंन्दू मुसलीम एकोप्यास सुरूग लावण्याच्या उद्देशाने हिंन्दू मुस्लीम जातीय दंगली घडवून राष्ट्रद्रोह करणार्या प्रवुत्तीने विशाळगडवरील न्यायप्रविष्ट असणाऱ्या अतिक्रमणाच्या विषयाचे निमित्य पुढे करित इतिहासकालीन, प्राचिन असणार्या पीर मलिक रेहान यांच्या दर्गाहची व गजापूर येथील मुलसलीम समाजाचे प्रार्थना स्थळावर हल्ला करत नासधूस करत येथील निष्पाप मुसलीमांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.हे निश्चितच गंभीर असून सदर विषयी सीआयडी मार्फत सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी.
येथील तमाम मुसलीम बांधवाना संरक्षण देऊन.पिडित लोकांना तात्काळ नुकसाण भरपाई देण्यात यावी आशी मागणी नांद्रे गावातील तमाम मुसलीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. वरील विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून नांद्रेच्या शिष्ठमंडळाने दिले आहे.या वेळी शिवसेनेचे ( शिंदे गट) युवा नेते मोहसीन मुल्ला, एमआयएमचे गवस मुल्ला, फिरोज मुल्ला,शाहनवाज मुल्ला, मोबीन मुल्ला, सरदार मुल्ला, राष्ट्रवादीचे सौफ मुजावर अय्याज मुजावर,व आदी विविध पक्षाचे युवक उपसिथित होते.