For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गावात उलट्या नौकेची घरं

06:47 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
गावात उलट्या नौकेची घरं
Advertisement

देशविदेशातून पर्यटक देतात भेट

Advertisement

जगात अनोख्या ठिकाणांची कमतरता नाही. एका गावात सर्व घरं उलट्या नौकेद्वारे तयार करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी वसलेले हे गाव स्वत:च्या अशाच घरांमुळे लोकप्रिय ठरले आहे तसेच एक विशेष प्रकारचे पर्यटनस्थळ झाले आहे. येथे लोक ही घरं भाड्याने मिळवू शकतात. या अनोख्या गावाचा स्वत:चा एक इतिहास देखील आहे.

इक्वीहे प्लाज उत्तर फ्रान्सच्या किनाऱ्यावर इंग्लिश खाडीच्या दिशेने असलेले एक छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 3 हजार इतकी आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस हे केवळ एक मासेमारी करणाऱ्या लोकांचे गाव होते, जेथे मासे पकडणाऱ्या मोठ्या नौकांना समुद्रात उतरविले होते. अशाप्रकारच्या जागांना ड्राय हार्बर म्हटले जाते. याचबरोबर या गावा अन्य कुठल्याही प्रकारचे आकर्षण नव्हते. परंतु आज इक्वीहेन प्लाज स्वत:च्या अनेक उलट्या नौकांच्या  घरांसाठी प्रख्यात आहे.

Advertisement

स्थानिक लोक याला क्विलेसएन एलएअर म्हणतात आणि आता हे पर्यटकांसाठी खास हॉलिडे डेस्टिनेशन ठरले आहे. जुया काळात जुन्या नौका मिळणे मोठी बाब नव्हती. येथून लोक खराब नौकांना किनाऱ्यावरून वरच्या दिशेने न्यायचे आणि त्यांना उलटी करून घराप्रमाणे वापरत होते.

इक्वीहेन प्लाजमध्ये बेकार नौकांना उंच जमिनीवर नेत उलटं करण्यात येत होते.  त्यावर विशेष पदार्थ टाकला जात होता, जेणेकरून पावसाचे पाणी आत शिरू नये. याचबरोबर एका बाजूने दरवाजा तयार करण्यात येत होता. तसेच खिडक्यांचीही निर्मिती केली जात होती. यानंतर आतील हिस्सा अत्यंत काळोखा असायचा.

या घरांमध्ये नौकांच्या लांबीची एक पूर्ण खोली असते अणि स्वयंपाक करण्यासाठी आणि झोपण्यासाठी जागाही असते. दुसऱ्या महायुद्धावेळढी येथील जवळपास सर्व नौकांची घरे नष्ट करण्यात आली होती. परंतु तरीही ही परंपरा टिकविली गेली. 1990 मध्ये येथील लोकांना स्वत:चा वारसा पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक उलट्या नौकांची घरं तयार केली ज्यामुळे पर्यटक आकर्षित झाले.

Advertisement
Tags :

.