महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुलक बैठकीत जे.आर.डी.टाटा’ यांच्या पुस्तकाचा परिचय

06:10 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लोकमान्य ग्रंथालयप्रणित बुलकच्या बैठकीत उदय लवाटे यांनी आर. एम. लाला लिखित ‘बियाँड दि लास्ट ब्ल्यू माऊंटन : लाईफ ऑफ जे. आर. डी. टाटा’ यांच्या पुस्तकाचा परिचय करून दिला. लेखकाने पाच वर्षे संशोधन करून हे पुस्तक लिहिले आहे.

Advertisement

जे. आर. डी. टाटा यांची ओळख एक उद्योजक व त्याही पलीकडे एक माणूस म्हणून कशी आहे, याचे चित्रण या पुस्तकात आहे. हवाई क्षेत्रावरील त्यांचे प्रेम, भावंडांशी असलेले संबंध, तल्लख विनोदबुद्धी, बारकाईने व बारकाव्यांसह अभ्यास करण्याची पद्धत, त्यांची पदोन्नती व निर्णय घेण्याची क्षमता या अनेक पैलूंबाबत या पुस्तकात माहिती मिळते, असे लवाटे म्हणाले.

पहिल्या महायुद्धावेळी हवाई हल्ले होताना लोक घरामध्ये लपून बसत होते. परंतु जेआरडी टेरेसवर जाऊन त्या विमानांना न्याहाळत असून दार्जिंलिंगमध्ये बंगालच्या राज्यपालांनी 500 लोक, स्त्रिया व मुलांना थंडीमध्ये तासभर ताटकळत ठेवले. हे करण्याचा तुम्हाला काय अधिकार? असे टाटांनी त्यांना विचारले होते. जे भारतासाठी चांगले तेच टाटांसाठी चांगले’ हे धोरण त्यांनी शेवटपर्यंत पाळले. नवनवीन गोष्टी करणे व ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, याचा त्यांना ध्यास होता, असेही लवाटे म्हणाले. प्रारंभी आरती आपटे यांनी प्रास्ताविक करून वक्त्यांचा परिचय करून दिला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article