‘इमोशनल’ रोबोट सादर
माणसांप्रमाणे भावना व्यक्त करणार
एकेकाळी सर्व छोट्यामोठ्या कामांसाठी लोकांवरच अवलंबून रहावे लागत होते. परंतु विज्ञानाच्या प्रगतीसोबत आमची ओळख रोबोट्सशी झाली, हे रोबोट फटाफट कामे आवरून घेतात. याचमुळे प्रत्येक क्षेत्रात या रोबोट्सचा वापर केला जात आहे. या रोबोटमुळे माणसाला अनेक लाभ देखील झाले आहेत आणि अनेक तोटे देखील झाले आहेत. परंतु अद्याप अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या रोबोटला करणे शक्य नाही. परंतु माणूस ते सहजपणे करू शकतो.
आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे रोबोट्समध्ये अनेक सुधारणा करणे शक्य झाले आहे. जगातील पहिला असा रोबोटे तयार करण्यात आला आहे, जो मानवी भावना समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार व्यक्त होऊ शकतो. हे काम चीनच्या वैज्ञानिकांनी करून दाखविले आहे.
चीनने स्वत:च्या नव्या आविष्काराद्वारे खळबळ उडवून दिली आहे. चीनने गाउनगुआ नं 1 नावाचा रोबोट तयार केला असून तो माणसांच्या सुखदुखात साथ देऊ शकतो. हा रोबोट वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आला आहे फुडान युनिव्हर्सिटीकडुन निर्मित या रोबोटचे वैशिष्ट्या म्हणजे तो मानवी भावनांना ओळखून त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकतो. या रोबोटमध्ये आनंद, संताप, दु:ख अशा भावना फीड करण्यात आल्या आहेत.
हा रोबोट वृद्धांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. फुडान युनिव्हर्सिटीचे डेप्युटी डीन गान झोगंक्से यांनी वृद्धांची सेवा आणि त्यांची काळजी घेण्यासाठी हा ह्युमनॉइट रोबोट तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. हा रोबोट वृद्धांच्या आरोग्याचा साथीदार असेल. तो त्यांच्या शारीरिक गरजा तसेच मानसिक आणि भावनात्मक आरोग्याचीही काळजी घेणार आहे. इमोशनल इंटेलिजेन्स असलेल्या या रोबोटला पाहून लोक थक्क होत आहेत.