महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रिक चमचा सादर

06:39 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 हजार रुपये आहे किंमत

Advertisement

बाजारात आता इलेक्ट्रिक चमचा देखील आहे. जपानच्या ड्रिंक्स निर्माता कंपनी किरिन होल्डिंग्सने इलेक्ट्रिक चमचा सादर केला आहे. हा चमचा अतिरिक्त सोडियमशिवाय मिठाची चव कायम ठेवणार असल्याचा संशोधकांचा दावा आहे. यामुळे आरोग्यदायी भोजनाला बळ मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

किरिन कंपनी हा इलेक्ट्रिक चमचा 10 हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. प्रारंभी केवळ 200 इलेक्ट्रिक चमचे तयार करण्यात आले आहेत. विदेशात पुढील वर्षापासून हे चमचे उपलब्ध होणार आहेत. प्लास्टिक आणि धातूने निर्मित या चमच्याला मीजी विद्यापीठाचे प्राध्यापक होमी मियाशिता यांच्यासोबत विकसित करण्यात आले आहे.

या चमच्याद्वारे खाद्यपदार्थांचा नमकीनपणा वाढविण्यास मदत मिळते. हा चमचा जीभेवर वीक इलेक्ट्रिक फील्ड पाठवितो. या तंत्रज्ञानाचे जपानमध्ये मोठे महत्त्व आहे, कारण तेथील प्रौढ दरदिनी सरासरी 10 ग्रॅम मीठाचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला पाहता हे प्रमाण दुप्पट आहे. अतिरिक्त सोडियमचे सेवन रक्तदाब, स्ट्रोक आणि अन्य आजार वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.

जपानची एक खाद्य संस्कृती आहे. यात नमकीन स्वादाला पसंत केले जाते. जपानी लोकांना समग्र स्वरुपात मीठाचे सेवन कमी करण्याची आवश्यकता आहे, परंतु आम्हाला जे खाण्याची सवय आहे, त्यापासून दूर जाणे अवघड ठरू शकते. याचमुळे आम्ही इलेक्ट्रिक चमचा विकसित केला आहे. 60 ग्रॅमचा हा चमचा रिचाजेंबल लिथियम बॅटरीद्वारे संचालित होतो असे किरिन कंपनीतील संशोधक आइ सातो यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article