गोदरेजकडून रेडी-टू मिक्स बॉडीवॉशचे सादरीकरण
वृत्तसंस्था /मुंबई
‘पूटिंग प्लॅनेट बिफोर प्रॉफिट्स’ या मूल्याच्या अनुषंगाने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने फक्त 45 रुपयांना असलेल्या गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारतातील पहिल्या रेडी-टू मिक्स बॉडीवॉशचे अनावरण केले. ही नवकल्पना पुनर्वापराच्या आणि अपव्यय कमी करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांसाठी शाश्वत निवड करण्यास सक्षम करते.
अभिनेता शाहरुख खानला गोदरेज मॅजिक बॉडीवॉशचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश त्याच्या रेडी टू-मिक्स फॉरमॅटसह, पर्यावरणविषयक समस्या तसेच ग्राहकांच्या आव्हानांसाठी एक उपाय आहे.
गोदरेज मॅजिक बॉडीवॉशला पॅकेजिंगमध्ये फक्त 16 टक्के प्लास्टिक आणि नियमित बॉडीवॉशच्या तुलनेत फक्त 19 टक्के ऊर्जा आणि साबण बार बनवण्यासाठी लागणाऱया एकूण उर्जेपैकी फक्त 10 टक्के ऊर्जा लागते. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश सिंगल जेल सॅशेमध्ये आणि बाटली आणि जेल सॅशेच्या कॉम्बी-पॅकमध्ये उपलब्ध आहे. सॅशेची किंमत 45 रुपये आहे तर कॉम्बी पॅक (बाटली जेल सॅशे) 65 रुपयांना आहे.
या सादरीकरणाप्रसंगी बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, ‘शाश्वतता ही आमच्या रणनीतीचा गाभा आहे. असे करताना आम्ही सर्वांना परवडणाऱया योग्य किंमतींवर अप्रतिम दर्जेदार उत्पादने बनवण्यासाठी बांधील आहोत.
ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करत नव्या उत्पादनांच्या निर्मितीवर भर असणार आहे. आम्ही सामाजिक उपक्रमांसह पर्यावरणाविषयी जनजागृती उपक्रमांसाठी पुढील 3 वर्षांमध्ये 100 कोटी रुपये खर्च करण्याचे वचन देत आहोत.