Sangli : जिल्हांतर्गत बदलीतील शिक्षकांना मिळाली नवी शाळा !
जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या १ हजार २९९ शिक्षकांना कार्यमुक्त
सांगली : जिप प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. प्राथमिक शिक्षणकडील जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या १ हजार २९९ शिक्षकांना कार्यमुक्त केले. यासर्वांना दुसरे दिवशी लगेचच नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.
शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका खासगी कंपनीला काम देण्यात आले. एकूण चार संवर्गातून सुमारे १ हजार २९९ जणांच्या नावाची यादी आली आहे. मात्र या संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले नव्हते. जुनी पेन्शन संघटनेसह इतरही शिक्षक संघटनांनी सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी मागणी केली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना याबाबत राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे व शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. बदली झालेल्या या सर्व १२९९ शिक्षकांना १५ ऑक्टोंबरला नव्या शाळेत हजर होण्याचे आदेश दिले.