For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

06:21 AM Nov 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश
Advertisement

तीन संशयितांना अटक, 2 लाख रुपये जप्त, म्हापसा पोलिसांनी केली कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

म्हापसा पोलिसांनी शनिवारी एका आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली. म्हापसा येथे एका कथित चोरी प्रकरणाच्या संदर्भात संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी पेलेल्या रकमेपैकी 2 लाख ऊपये जप्त केले आहेत.  अटक केलेल्या तीन संशयितापैकी एक संशयित  हा  हिस्ट्रीशीटर आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे.

Advertisement

अटक केलेल्या संशयितांमध्ये कालू राम (19, रा. काणका व मूळ राजस्थान), जुहारा राम (24, राजस्थान) व नारायणलाल चौधरी (35, राजस्थान) यांचा समावेश आहे. कालू राम हा सदर दुकानात कामाला होता. कालू रामला म्हापसा पोलिसांनी तर जुहारा राम व नारायणलाल या दोघांना राजस्थान पोलिसांच्या साहाय्याने राजस्थानात अटक केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टॅक्सी स्टँडजवळील काजूविक्रीच्या दुकानातून गेल्या 31 ऑक्टोबर 2024 रोजी 3.50 लाख रुपयांची रक्कम चोरी झाली होती. याप्रकरणी दुकानमालक सुरेंद्रसिंग पुरोहित यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दि. 30 व 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री संशयितांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला व दुकानात तक्रारदारने ठेवलेली 3 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम पळवून नेली होती. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी या संशयितांचा माग काढला होता. चोरीच्या घटनेपासून संशयित कालू राम हा फरार होता. संशयित जुहारा राम नारायणलाल चौधरी हे दोघे संशयिताचे मित्र आहेत  व अधूनमधून त्यांची गोव्यात ये-जा असायची. पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल आनंद राठोड, अनिल राठोड, प्रथमेश मोटे, अक्षय पाटील व प्रकाश पोळेकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement
Tags :

.