महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्समधून परतलेल्या भारतीयांची गुजरातमध्ये चौकशी

06:35 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अवैध इमिग्रेशन नेटवर्कचा होणार भांडाफोड : एजंट्स आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सक्रीय

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

फ्रान्समधून 276 भारतीय परतल्यावर गुजरात पोलिसांनी अवैध इमिग्रेशनच्या नेटवर्कचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता फ्रान्समधून परतलेल्या भारतीयांकडून मदत घेतली जाणार आहे. या भारतीयांमध्ये अनेक जण मूळचे गुजरातमधील आहे. लोकांना अन्य देशांमध्ये अवैध मार्गाने प्रवेश मिळवून देण्याच्या नावावर एजंट्स नेटवर्क चालवत आहेत. या एजंट्सची धरपकड करण्यासाठी 4 पथकांची स्थापना केल्याची माहिती सीआयडी क्राइमचे पोलीस अधीक्षक संजय खारत यांनी दिली आहे.

प्रवासी गुजरातमध्ये परतल्यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहोत. या लोकांना अमेरिकेत पोहोचण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले होते का याचीही चौकशी केली जाणार आहे. तसेच आतापर्यंत अशाप्रकारे किती लोक विदेशात पोहोचले आहेत याचीही चौकशी होणार आहे. सीआयडीने एजंट्सशी निगडित प्रारंभिक माहिती मिळविली असल्याचे खारत यांनी सांगितले आहे.

छोटी शहरे आणि गावांमध्ये राहणारे परंतु विदेशात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांशी हे एजंट्स संपर्क साधतात. या पूर्ण नेटवर्कला आंतरराष्ट्रीय स्तरावर संचालित केले जाते. प्रवाशांची निवड केल्यावर देश आणि तेथील मागणीनुसार प्रत्येकवेळी वेगळ्या प्रकारे हे नेटवर्क काम करते. शुल्क देखील त्याच हिशेबानुसार निश्चित केले जाते.

फ्रान्सने रोखले होते विमान

22 डिसेंबर रोजी दुबईतून निकारागुआ येथे जात असलेले विमान वाट्री विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरले होते. या विमानातून मानव तस्करीच्या पीडितांना नेण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे या विमानाला उ•ाण करण्यापासून रोखण्यात आले होते. या विमानातून 300 हून अधिक भारतीय प्रवास करत होते. यातील 25 भारतीयांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला आहे. या भारतीयांना पॅरिसमधील स्पेशल झोन ‘चार्ल्स द गॉल’ विमानतळावरील अशा भागात पाठविण्यात आले आहे, जेथे आश्रय मागणाऱ्या लोकांना ठेवले जाते. दुबईतून फ्रान्समध्ये पोहोचल्या विमानात लोक स्वमर्जीने प्रवास करत होते. याचमुळे फ्रान्सच्या पोलिसांनी मानव तस्करीच्या दृष्टीकोनातून सुरु असलेला तपास थांबविला आहे. आता याला इमिग्रेशनच्या कायद्यांचे उल्लंघन मानले जात आहे.

4 दिवसांनी परतले मायदेशी

4 दिवस फ्रान्समध्ये रोखण्यात आल्यावर विमान मंगळवारी सकाळी मुंबईत पोहोचले होते. या विमानाने 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी पॅरिसच्या वाट्री विमानतळावरून उड्डाण केले होते. विमानतळावर पोहोचताच सीआयएसफने या भारतीयांची चौकशी केली होती. फ्रान्समध्ये विदेशी नागरिकांना 4 दिवसांपेक्षा अधिक काळ ताब्यात ठेवले जाऊ शकते. अधिक काळ ताब्यात ठेवण्याकरता न्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये ताब्यात ठेवण्याचा कालावधी 24 दिवसांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. 24 डिसेंबर रोजी फ्रान्सच्या एका न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी नाताळाच्या सुट्यांमध्येही काम करत ताब्यात ठेवण्यातालेल्या प्रवाशांची चौकशी केल्या विमान रवाना करण्याचे आदेश दिले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article