For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंटरनेट टेलिपोर्टेशन

06:05 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंटरनेट टेलिपोर्टेशन
Advertisement

एक दिवस तुमचे शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात केवळ एक बटन दाबून पोहाचू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. परंतु वैज्ञानिकांनी आता या स्वप्नाला वास्तवाच्या नजीक आणण्यासारखी कामगिरी केली आहे. वैज्ञानिकांनी आता क्वांटम टेलिपोर्टेशनचे मोठे पाऊल उचलले आहे. क्वांटम टेलिपोर्टेशन हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्यात वैज्ञानिक क्वांटम स्टेट (म्हणजेच एखाद्या कणाची खास माहिती)ला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात, ते देखील त्याला फिजिकली न नेता.

Advertisement

मागील वर्षी अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक प्रेमकुमार आणि त्यांच्या टीमने एक मोठी कामगिरी केली. त्यांनी पहिल्यांदा क्वांटम स्टेटला 30 किलोमीटर लांब फायबर ऑप्टिक केबलद्वारे टेलिपोर्ट केले. वैज्ञानिकांनी हे करण्यासाठी अनेक स्मार्ट ट्रिक्सचा वापर केला, जेणेकरून नाजुक क्वांटम माहिती खराब होऊ नये.

क्वांटम जग अत्यंत अजब असते, परंतु क्वांटमच्या जगात एक कण (जसा फोटॉन, जो प्रकाशाचा छोटासा हिस्सा असतो) एकाचवेळी अनेक शक्यतांसोबत राहू शकतो. याला क्वांटम स्टेट म्हणतात. परंतु क्वांटम स्टेट अत्यंत नाजुक असते. काहीशी उष्णता, वीज किंवा अन्य तरंगांची धडक याला नष्ट करू शकते. याला डिकोहिरेन्स म्हटले जाते. म्हणजेच क्वांटम स्टेटचे वैशिष्ट्या संपुष्टात येते. याचमुळे याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे अवघड आहे. इंटरनेटच्या केबलमधून असंख्य डाटा पळत असताना हे काम आणखी अवघड ठरते.

Advertisement

वैज्ञानिकांनी नेमकं काय केले?

प्रेम कुमार यांच्या टीमने अनेक स्मार्ट पद्धतींचा वापर केला..

योग्य वेवलेंथ निवडणे : त्यांनी स्वत:च्या फोटॉनला अशा वेवलेंथवर पाठविले जेथे इंटरनेटचा डाटा त्याचा मार्ग रोखू शकणार नाही.

क्वांटम चॅनलला वेगळे करणे : फोटॉनसाठी एक खास चॅनेल तयार केला, जेणेकरून तो इंटरनेट डाटाच्या गर्दीत हरवू नये.

स्कॅटरिंगला कमी करणे : प्रकाशाची किरणे जेव्हा दुसऱ्या किरणांना धडकतात, तेव्हा ती विखुरली जातात. वैज्ञानिकांनी फोटॉन विखुरला जाऊ नये, अशी पद्धत वापरली.

यामुळे टीम पहिल्यांदाच खऱ्या इंटरनेट ट्रॅफिकदरम्यान क्वांटम स्टेटला टेलिपोर्ट करण्यास यशस्वी ठरली.

हे यश का महत्त्वाचे?

वैज्ञानिकांच्या या कामगिरीमुळे भविष्यात अनेक लाभ होणार आहेत...

सुपर सिक्योर इंटरनेट : क्वांटम टेलिपोर्टेशनद्वारे डाटा पाठविण्याची पद्धत इतकी सुरक्षित आहे की, कुठलाही हॅकर ती तोडू शकत नाही. जर कुणी तसा प्रयत्न केला तरीही क्वांटम स्टेट त्वरित नष्ट होईल. हॅकिंगचा थांगपत्ता लागेल. तुमचा बँक पासवर्ड, क्रेडिट कार्ड डिटेल किंवा पर्सनल चॅट्स पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित राहू शकतील.

क्वांटम इंटरनेट : हे तंत्रज्ञान भविष्यात एक क्वांटम इंटरनेट ठरू शकते, जे आजच्या इंटरनेटपेक्षा लाखो पट वेगवान आणि शक्तिशाली असेल. यामुळे कॉम्प्युटिंग, डाटा प्रोसेसिंग आणि सेंसर टेक्नॉलॉजीत क्रांति घडू शकते.

नवे तंत्रज्ञान : क्वांटम टेलिपोर्टेशनद्वारे वैज्ञानिक नव्या प्रकारचे सेंसर, मेडिकल उपकरण आणि सुपरफास्ट कॉम्प्युटर निर्माण करू शकतात. हे सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी पट प्रगत असतील.

जुनी केबल, नवे काम : क्वांटम टेलिपोर्टेशनसाठी नवी इंटरनेट केबल टाकण्याची गरज नाही. जुनी फायबर ऑप्टिक केबलच क्वांटम कम्युनिकेशनसाठी काम करणार आहे.

Advertisement
Tags :

.