For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथ्वी बर्वे 'फर्ग्युसन गौरव' पुरस्काराने सन्मानित

06:15 PM Jan 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पृथ्वी बर्वे  फर्ग्युसन गौरव  पुरस्काराने सन्मानित
Prithvi Barve honored Ferguson Gaurav award

विटा प्रतिनिधी

पॅरा ॲालम्पिक स्पर्धेत देशाचे नाव उज्वल करणारी युवा टेबल टेनिसपटु पृथ्वी जयदेव बर्वे हिला फर्ग्युसन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या हस्ते पृथ्वीचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील दिग्गज शा ब मुजुमदार यांचाही गौरव करण्यात आला.

Advertisement

अनेक आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी जयदेव बर्वे यांनी क्रीडाक्षेत्रात घवघवीत यश मिळवले आहे. तीच्या या कामगिरीबद्दल पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने हा पुरस्कार देऊन तीचा विशेष सन्मान केला. तीच्या या यशात तिचे प्रशिक्षक ललित सातघरे, दीप्ती चाफेकर, सुरेंद्र देशपांडे, जयदेव व कामाक्षी बर्वे, शारदा सेंटर यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव आणि व्ही.पी.सिंग यांच्यासह ख्यातनाम लेखक भालचंद्र नेमाडे, प्रभा अत्रे आदी मान्यवरांना यापुर्वी हा सन्मान देण्यात आला आहे. यावर्षी पृथ्वी बर्वे आणि शां. ब. मुजुमदार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement

पृथ्वी पॅरा टेबल टेनिस महिलांच्या क्लास ९ प्रकारात खेळते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाऱ्या पृथ्वीने आत्तापर्यंत चौदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सिंगल, डबल आणि मिक्स डबल्समध्ये पदके मिळवली आहेत. पृथ्वीला आशिया, कॉमनवेल्थ आणि पॅरा ऑलम्पीकमध्ये देशाचा तिरंगा डौलाने फडकावायचा आहे. यासाठी ती कसून सराव करते आहे. शारीरीक दुर्बलतेचा तिने तिच्या मनावर आणि खेळावर परिणाम होऊ दिला नाही. यासाठी तिचे वडील जयदेव, आई कामाक्षी आणि भाऊ शंतनू यांनी सुरूवातीपासून काळजी घेतली आहे. तिला प्रोत्साहन दिले आहे.

पृथ्वीचे यश प्रेरणादायी

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक विद्यार्थ्यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला नावलौकिक मिळवला आहे कला विज्ञान साहित्य याबरोबर क्रीडा प्रकारातही डेक्कन चे विद्यार्थी चमकत आहेत याचा अभिमान आहे पृथ्वीने मिळवलेले यश देशभरातील युवकांसाठी प्रेरणादायी आहेत असे गौरव उद्गार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले.

पृथ्वी एकमेवाद्वितीय फर्ग्युसन्स
पृथ्वीच्या कामगिरीची दखल घेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा अत्यंत पतिष्ठेचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार पृथ्वीला प्रदान करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासह भालचंद्र नेमाडे, प्रभा अत्रे आदी मान्यवरांना यापुर्वी हा सन्मान देण्यात आला आहे.  देश पातळीवरील अत्यंत महान लोकांना या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. याच पंक्तीत आता पृथ्वीचा समावेश झाला आहे. मात्र यातही एक वैशिष्ठ्य म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना हा पुरस्कार मिळवणारी पृथ्वी एकमेव विद्यार्थीनी आहे. त्यामुळेच पृथ्वी एकमेवाद्वीतीय आहे, असेच म्हणावे लागेल.

पृथ्वीचे टेबल टेनिस मानांकन (ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ च्या क्रमवारीनुसार)
भारत क्रमांक २
जागतिक क्रमांक १३
आशिया रँक ५

Advertisement
×

.