महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कसबेकर-मेटगुड क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

10:44 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कसबेकर-मेटगुड क्लिनिक येथे रविवारी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. रुग्णालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला भरतेश नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. संगीता मोरेश्वर उपस्थित होत्या. डॉ. मोरेश्वर यांनी आपल्या भाषणातून नर्सिंग सेवेविषयी माहिती दिली. डॉक्टरना मदत करण्यात तसेच रुग्णांची काळजी घेण्यात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात. रुग्णसेवेसाठी नर्सिंग प्रोफेशनल्स विकसित करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सीईओ डॉ. बसवराज मेटगुड यांनीही परिचारिकांचे कौतुक केले. संचालिका डॉ. शारदा मेटगुड, स्वरुपा मेटगुड, डॉ. पी. एन. शांतीगिरी यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ परिचारिका लक्ष्मी उडादगी, रेणुका कलगुट्टे व नंदा कोळवी यांच्या नर्सिंग सेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article