For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल जामिनाला अंतरिम स्थगिती

06:42 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल जामिनाला अंतरिम स्थगिती
Advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला : निकालापर्यंत कारागृहातच वास्तव्य, नोटीस जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या जामिनाला अंतरिम स्थगिती दिली असून दीर्घ उलट तपासणीनंतर निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाचा अंतिम आदेश येण्यास दोन-तीन दिवस लागू शकतात. साहजिकच जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत केजरीवाल यांना तुऊंगातच राहावे लागणार आहे.

Advertisement

राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंबंधी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात आली. ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे.

ईडीने शुक्रवारी सकाळी दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन केजरीवाल यांच्या जामिनाविरोधात याचिका दाखल केली. दिल्ली हायकोर्टाने ईडीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याचे अपील मान्य केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि रविंदर जुडेजा यांच्या खंडपीठाने सुनावणी सुरू केली. यासोबतच कनिष्ठ न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत प्रभावी होणार नाही, असे सांगण्यात आले. म्हणजेच केजरीवाल यांच्या सुटकेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी उच्च न्यायालयात ईडीची बाजू मांडली. ईडीचे विशेष वकील झोहेब हुसैन हेही न्यायालयात हजर होते. तर, केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी कोर्टरुममध्ये होते. तर ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.