महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लालू कुटुंबीयांना अंतरिम जामीन

06:42 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोकरीसाठी जमीन प्रकरण : 27 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू कुटुंबियांना शुक्रवारी दिलासा मिळाला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, हेमा यादव आणि मिसा भारती यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. न्यायालयाने सर्वांना एक लाख ऊपयांच्या जातमुचलक्मयावर अंतरिम जामीन मंजूर केला. शुक्रवारच्या सुनावणीवेळी लालू यादव आजारपणामुळे हजर राहू शकले नाहीत. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राबडीदेवी आणि मिसा भारती बुधवारी दिल्लीत पोहोचले होते. तर तेजस्वी यादव आधीच दिल्लीत होते.

‘लँन्ड फॉर जॉब’ प्रकरणात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बिहारमधील अनेक लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने मिळाल्याचा आरोप आहे. रेल्वेत चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्या देण्याच्या बदल्यात त्यांना भूखंड देण्यासंबंधीचे हे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून न्यायप्रविष्ट आहे. सुमारे डझनभर लोकांकडून जमिनी घेऊन त्यांना कोणतीही जाहिरात न छापता रेल्वेत नोकरी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला सीबीआयने तपास सुरू केला होता. सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही तपास सुरू करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article