महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा ग्राम विकास निधी वर्गणीवरील व्याज वाटप

05:53 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
Interest distribution on District Rural Development Fund subscription
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

जि..चे सीईओ कार्तिकेयन एस यांच्या सुचनेनुसार 2016-17 ते 2013-24 अखेर पर्यंतचे प्रलंबित असलेले व्याज वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली.

Advertisement

ग्रामपंचायतकडून दरवर्षी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 0.25 टक्के वर्गणी अंशदान स्वरूपात वसुली करून जिल्हा ग्रामविकास निधीमध्ये जमा केली जाते. या जिल्हा ग्राम विकास निधीचा उपयोग ग्रामपंचायतींना मागणीनुसार विकास तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी कर्ज स्वरूपात दिले जाते. वाटप करण्यात आलेल्या कर्जावर द.सा..शे. 5 टक्के व्याज आकारण्यात येते. प्रतिवर्षी जमा होणाऱ्या अंशदान रकमेवर 2.50 टक्के प्रमाणे व्याज वाटप करण्यात येते.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, जिह्यातील 12 तालुक्यांतून एकूण 13 कोटी 2 लाख 61 हजारांची वर्गणी जमा झाली आहे. या वर्गणीवर 2.50 टक्के व्याजदाराने 61 लाख 69 हजारांचे व्याज वाटप केले जाणार आहे. यामध्ये आजरा तालुक्यात 2 लाख 40 हजार, भुदरगडमध्ये 3 लाख 76 हजार, चंदगड 3 लाख 14 हजार, गगनबावडा 77 हजार, गडहिंग्लज 4 लाख 26 हजार, हातकणंगले 9 लाख 2 हजार कागल 4 लाख 89 हजार, करवीर 12 लाख 26 हजार, पन्हाळा 5 लाख 58 हजार, राधानगरी 4 लाख 70 हजार शाहूवाडी 4 लाख 17 हजार, शिरोळ 6 लाख 82 हजार व्याज वाटप केले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article